The students planted 350 nativstudents planted 350 native trees and survivede trees and survived
The students planted 350 nativstudents planted 350 native trees and survivede trees and survived 
कोल्हापूर

दत्तक योजनेतून विद्यार्थ्यांनी लावली 350 देशी झाडे अन्‌ जगवलीही

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : पर्यावरणशास्त्र विभागाने वृक्ष दत्तक योजना सुरू केली. यात सामाजिक संस्था या विभागाकडे रोपे देतात. त्यानंतर त्या रोपांची लागवड आणि त्यांचे संगोपन ही सर्व जबाबदारी पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी घेतात. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात सुमारे 350 झाडे या योजनेतून लावली आणि जगवली आहेत. परिणामी, शिवाजी विद्यापीठाचे वैशिष्ट्य असणाऱ्या ग्रीन कॅम्पस उपक्रमाला पाठबळ मिळाले आहे. 

पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याचेही मूल्यमापन नॅक समितीकडून केले जाते. त्यावर विद्यापीठाला गुण दिले जातात. याला ग्रीन कॅम्पस असे म्हणतात. शिवाजी विद्यापीठाने ग्रीन कॅम्पस अंतर्गत पथदर्शी काम केले. गुण, परीक्षण याच्याही पलीकडे जाऊन विद्यापीठाने परिसरातील जैवविविधता जपली आहे.

पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे यातील योगदान उल्लेखनीय आहे. या अधिविभागाने वृक्ष दत्तक योजना राबवली. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी विभागाकडे रोपे दिली. विद्यार्थ्यांनी त्याची लागवड करून त्यांचे संगोपन केले. यातून या परिसरात सुमारे 350 झाडे लावून जगवली. झाडांना पाणी देणे, आळी करणे, खते देणे या कामात विद्यार्थी मदत करतात. एमएससीच्या दोन्ही वर्षांतील विद्यार्थ्यांना हे काम दिले आहे. बहुतांश झाडेही देशी आहेत. यामुळे ग्रीन कॅम्पस या योजनेला पाठबळ मिळाले आहे. 

असे आहेत उपक्रम... 
- स्वयंपूर्ण रोपवाटिका 
- मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड 
- जलसंधारणातून जलस्वयंपूर्णता 
- घनकचरा व्यवस्थापन 
- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 
- किचन वेस्टपासून गॅस निर्मिती 

वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन करून ती जगवणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे पर्यावरणशास्त्र अधिविभागाने दत्तक योजना सुरू केली. संस्थांनी दत्तक घेतलेल्या रोपांचे संगोपन विद्यार्थी करतात. यात एम.एस्सी.च्या दोन्ही वर्षांतील विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी असून, विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने संगोपनाचे काम करतात. 
- पी. डी. राऊत, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र अधिविभाग 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT