Students will receive two uniforms at time in belgaum
Students will receive two uniforms at time in belgaum 
कोल्हापूर

यंदा विद्यार्थ्यांना मिळणार एकाचवेळी दोन गणवेश, शाळा सुरू झाल्यानंतर होणार वितरण 

मिलिंद देसाई

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब झाला आहे. मात्र शिक्षण खात्याने शाळांना सुरुवात झाल्यानंतर दरवर्षी मोफत वितरीत केल्या जाणाऱ्या गोष्टींना अधिक विलंब होऊ नये यासाठी आतापासूनच शिक्षकांना नियोजन करण्याची सुचना केली आहे. तसेच दरवर्षी वर्षातून दोन वेळा वितरीत केले जाणारे गणवेश एकाचवेळी वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन जोड गणवेष मिळणार आहेत. 


दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाठ्‌यपुस्तकांसह गणवेश वितरीत केला जातो. तर दुसरा गणवेश नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात वितरीत केला जातो. मात्र यावेळी शाळा विलंबाने सुरु होणार असल्याने एकाचवेळी दोन्ही गणवेश वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे दरवर्षी दुसऱ्या गणवेशासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी प्रतिक्षा थांबणार आहे. दरवेळी पहिला गणवेश वेळेत उपलब्ध करुन दिला जातो. मात्र दुसऱ्या गणवेशासाठी दरवर्षी विलंब होत असतो. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना एकच गणवेश उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्‍त होत झाली होती. तसेच काही वर्षांपुर्वी विद्यार्थ्यांना शिवलेला गणवेश दिला जात होता मात्र सध्या फक्‍त गणवेशाचा कपडा उपलब्ध करुन दिला जातो. त्यानंतर पालकांना गणवेश शिवून घ्यावा लागतो. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील सरकारी शाळांमधील दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी गणवेश वितरणाचा लाभ होणार आहे. सरकारकडून फक्‍त सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनाच गणवेशाचे वितरण करण्यात येते तर अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करावा लागतो. 

2019-20 च्या शैक्षणिक वर्षासाठी दुसऱ्या गणवेशाची रक्‍कम विलंबाने शाळा सुधारणा कमिटीच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. त्यामुळे काही शाळांनी गणवेश खरेदी केलेला नाही. त्या शाळांना शाळा सुरु होण्याअगोदर गणवेश खरेदी करण्याची सूचना करण्यात आली असून त्यामुळे एकाचवेळी दोन्ही गणवेश वितरीत होण्याची शक्‍यता आहे. 

-अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी


संपादन- धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT