कोरोना व्हायरसची बेळगाव ने घेतलीय धडकी.... - https://www.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-regional-department-has-been-alerted-because-corona-virus-258094
कोरोना व्हायरसची बेळगाव ने घेतलीय धडकी.... - https://www.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-regional-department-has-been-alerted-because-corona-virus-258094 
कोल्हापूर

आली आली, तोंडाला पाणी सोडणारी थायलंडची गोड चिंच आली.! 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ही चिंच पहिल्यांदा पाहिली की, ती खूप आंबट आहे असे वाटते; पण बॉक्‍समधून काढून चिंचेचा एक खंगोल खाल्ला की, ती किती खाऊ अन्‌ किती नको, असे होते. गुळ अन्‌ साखरेसारखी ही चिंच आहे, हे पाहिले की ते अनेकजण ती घेऊ लागतात. ही आहे थायलंडची गोडगुळमाट चिंच. काही दिवसांपूर्वी वाशी (नवी मुंबई) येथील मार्केटमधून ही थायलंड चिंच कोल्हापुरच्या बाजारपेठेत आली आहे. ज्यांना ही चिंचेचे गुणधर्म माहिती आहेत. ते ती कुठेही मिळू दे. ते ही चिंच घेतात. एकदा खाल्ली की, अनेकजण ती चिंच पुन्हा पुन्हा घेतात. 

आपल्या भारतीय चिंचेसारखीच ही चिंच दिसते. भारतीय चिंचेसारखाच हा थायलंड चिंचेचा खंगोल असतो. भारतीय चिंच मात्र प्रचंड आंबट असते. ही चिंच गोड असल्यामुळे लहान मुलांबरोबर सर्वांनाही ही चिंच खूप आवडते. या चिंचेचं वैशिष्ठ्य म्हणजे, यामध्ये अँटीऑक्‍सिडंटस्‌ असतात. शिवाय जळजळ प्रतिबंधक गुण या चिंचेत आहे. हृदयरोग, कर्करोग अन्‌ मधुमेहावर ही चिंच गुणकारी असल्याचे संशोधन अहवालात नोंद आहे. यातील चिंचोका भाजून किंवा चिंचोका दगडावर घासून पाण्यात घालून प्यायलानंतर रक्तातील अचानक कमी झालेली साखर पुर्ववत होते. वजन कमी होते. फॅटी लिव्हरचे आजारावरही ही चिंच गुणकारी ठरली आहे. ही चिंच उत्तर अफ्रिका अन्‌ आशिया खंडात भरपूर प्रमाणात मिळतात. भारतातसुद्धा थायलंडची चिंच काही ठिकाणी उपलब्ध आहे; पण मोठ्या प्रमाणात ही चिंच अजूनही थायलंडवरुन मुंबई, भारतातील अन्य मोठ्या शहरात पाठविली जाते. 

चिंचेबरोबर या चिंचेचा लगदाही मिळतो. अन्य ड्रायफ्रुटप्रमाणे या चिंचेचा लगदा हा दूध, बासुंदी, रबडी आदीमध्ये वापरला जातो. कोणत्याही पदार्थात ही चिंच टाकली तर गुळ, साखर, मध घालण्याची गरज नाही. इतकी ती गोड आहे. विशेष म्हणजे, आपल्या वातावरणातही ही चिंच उगवते. 

थायलंड चिंच अनेकजण विकत घेतात. विशेषत: लहान मुलांसाठी ही चिंच घेतली जाते. ही चिंच वाशी मार्केटमधून आणली जाते. कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी आदी मार्केटमध्ये ती उपलब्ध आहे.'' 
- यासीन बागवान (रंगारी), विक्रेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT