Tempo Bought By Selling Fruit During The Corona Period Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोरोना काळात फळविक्री करून घेतला टेंपो

विठ्ठल चौगुले

नूल : गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. या काळात लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकजण बेरोजगार झाले, पण यातूनही संधी शोधत व्यवसाय वाढवला आणि आता त्याच्या दारात चार चाकी टेंपो आला आहे. सायकलवरून दारोदारी फळ विक्री करणाऱ्या सुभाष कृष्णा तोरस्कर या बीएससी ऍग्रीची पदवी घेतलेल्या युवकाने ही किमया साधली आहे. 

नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुभाष तोरस्कर हे मूळचे इचलकरंजीचे, मात्र सध्या ते नूल येथे सासरवाडीत स्थायिक झाले आहेत. पूर्वी सायकल व मोटारसायकलवरून ते गावोगावी फळ विक्रीचा व्यवसाय करत. काही वेळा घरीच फळविक्री करत. कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाला आणि त्यांच्या व्यवसायावर संकट आले. संसारगाडा चालविण्याचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला.

तेव्हा न खचता सुभाष यांनी गडहिंग्लज, संकेश्‍वर येथून फळे खरेदी करून लोकांच्या आणि कोरोना रुग्णांच्या दारात जाऊन फळे विक्रीला सुरवात केली. मोटारसायकलवरून ते भागात विक्री करू लागले. दारात आणि ताजी फळे मिळू लागल्याने लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला. त्यातून त्यांचा उत्साह वाढला.

उच्चशिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता त्यांनी लॉकडाउनच्या काळात व्यवसाय वृद्धी केली. पहाटेपासून ते या व्यवसायात राबतात. वाढलेल्या व्यवसातून साठलेली पुंजी खर्च केली आणि टेंपो खरेदी केला. आता टेंपोतून ते गावोगावी फिरून फळविक्री करतात. 

एक प्रकारची सेवाच
दरात घासाघिस न करता, अधिक नफा मिळविण्यापेक्षा खेड्यात फळे उपलब्ध करून देण्यात एक प्रकारची सेवा आहे. 
- सुभाष तोरस्कर 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT