Three gambling dens in Kabnur demolished
Three gambling dens in Kabnur demolished 
कोल्हापूर

कबनूरमधील तीन जुगार अड्डा उद््ध्वस्त

पंडित कोंडेकर

इचलकरंजी  ः कबनूर येथील जयहिंदनगर गल्ली नं. 3 मधील यंत्रमाग कारखान्यात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 9 जणांना अटक केली. पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार व त्यांच्या पथकाने ही कारवाई सायंकाळी केली. कारवाईत 8 मोबाईल, 5 मोटारसायकली, 23 हजार रोकड असा सुमारे 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कबनूर परिसरातील जयहिंदनगर येथील संतोष लाटणे यांच्या यंत्रमाग कारखान्यात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांना मिळाली. त्यांच्यासह पथकाने कारखान्यावर छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना लतिफ फत्तुसाब पानारी (दत्तनगर), मल्लाप्पा राजाराम लाटणे (जयहिंदनगर), बाजीराव पांडुरंग पाटील, नितीन मारुती खोत, संदीप काशिनाथ मन्यागोळ (दत्तनगर), हमिद महंमद मुरसल (सहारानगर, रुई), आकाश राजेंद्र गांजवे (लक्ष्मीमाळ, कबनूर) व संतोष कुमार लाटणे (जयहिंदनगर) व अस्लम महंमद कोल्हापूरे (लक्ष्मीनगर) यांना पकडले. यामध्ये 23 हजार 110 रुपये रोकड, 46 हजार रुपयांचे 8 मोबाईल व 1 लाख 70 हजारांच्या 5 मोटारसायकली असा सुमारे 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बिरादार यांच्यासह कॉन्स्टेबल सुनील पाटील, सागर हारगुले, जगदीश अकिवाटे, गजानन बरगाले, संतोष साळुंखे, सद्दाम शेख यांच्या पथकाने केली.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT