कोल्हापूर

बाजार भाव

CD

17364

भाजीपाल्याचे भाव चढेच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २४ ः भाजीपाला विशेषतः फळांची मागणी वाढली आहे. आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव चढेच राहिले. घाऊक बाजारपेठेत भाव नियमित तर किरकोळ बाजारात भाव चढेच राहिले.
शाहू मार्केट यार्डात आज भाजीपाल्याच्या आवकेत मोठी वाढ झाली. पावसाळी वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लवकर काढला. त्यामुळे एकाच वेळी भाजीपाल्याची आवक वाढली. परिणामी भाव जैसे थे राहिले. यात वांगी, टोमॅटो, गवार, कारली, भेंडी या भाज्यांची आवक मोठी झाल्याने भाव कमी होते. यापूर्वी याच भाज्यांचे भाव दहा किलोसाठी सरासरी ३०० रुपयांवर होते. तेच भाव आवक वाढल्यानंतर शंभर रुपयांनी कमी झाले. परिणामी घाऊक बाजारात भाजीपाला स्वस्त होता, मात्र घाऊक बाजारात खरेदी केलेला माल आठवडी बाजारात विकताना सरासरी ६० ते ८० रुपये एक किलो भावात विकला गेला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला महाग दरात खरेदी करावा लागला. बहुतांशी माल कवठेमहंकाळ, शिरोळ, शिरढोण, तासगाव, गोकाक, चिक्कोडी, निपाणी, नंदी, वाळवा आष्टा, सांगोला या भागातून आला.
घाऊक बाजारपेठेत आलेल्या एकूण भाजीपाल्यापैकी जवळपास ६० टक्के मालाचे स्थानिक बाजारात सौदे करून पाठवला गेला, तर उर्वरित ४० टक्के माल कोकण बाजारपेठेकडे पाठवला गेला अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, शहरातील उपनगरीय बाजारात भाजीपाल्याचे भाव काहीसे कमी होते. थेट शेतकऱ्यांनीच बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणाला होता. त्यामुळे कमी भावात त्याची विक्री झाली. असा प्रकार कसबा बावडा, कदमवाडी, उचगाव, आर.के. नगर, ऋणमुक्तेश्वर बाजार, पाडळकर मार्केट येथे होता.

चौकट
घाऊक बाजारातील १० किलोचे भाव*किरकोळ बाजारातील प्रती किलो भाव
कोबी* ५५*२० रुपये एक नग
वांगी*१५०*४५
टोमॅटो*११०*६०
ओली मिरची*४२५*८०
ढबू मिरची*१५०*३५
गवार*२५०*४०
ओला वाटाणा*६५०*८५
कारली*१५०*४५
भेंडी*१५०*३५
दोडका*१५०*३५
काकडी*१५०*३०
वाल*३५०*४०
बिन्स*७००*८०
दुधी भोपळा*७५*२० रु. एक नग
गाजर*२५०*३५
आले*२१०*२५
फ्लॉवर* १५०*१५
पडवळ*३००*१५
भोपळा*५०*२०
शेवगा शेंग* १५०*२०
तोंडली*१२५*२०
चवळी शेंग*२७०* ४०

चौकट
पालेभाज्यांचे शेकडा पेंडीचे भाव
कोथिंबीर*७५०
मेथी* ११००
कांदा पात* ८००
पालक* ४८५
पोकळा* ५५०
तांदळी* ४००
-----------------
हापूस आंबा तेजी; मागणी वाढली
कोल्‍हापूर, ता. २४- शाहू मार्केट यार्डात फळ बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात परप्रांतीय, परदेशी फळांची आवक मोठी आहे. स्थानिक फळांची आवक जेमतेम असल्याने भाव चढेच आहेत. यात सर्वाधिक मागणी हापूस आंब्याला तसेच दाक्षिणात्य आंब्याला होती. तरीही आंब्याचे भाव चढेच आहेत. कोकण तसेच दाक्षिणात्य आंब्याची आवक मात्र जोरात असल्याने आंबा खाण्यासाठी कमी पडणार नाही, एवढी आवक झाली आहे. स्थानिक शहरी बाजारातील गरज भागवून ग्रामीण बाजारपेठेतही आंबा पाठवला जात आहे. सरासरी रोज २८० ते ७०० पेट्यांची तसेच बॉक्सची आंबा आवक होत आहे. त्यामुळे फळ बाजारात सध्या सर्वाधिक उलाढाल ही आंब्याची होत आहे. त्यामुळे खवय्यांनाही संधी असल्याने किरकोळ एक बॉक्स दोन पेट्या खरेदी करणारा ग्राहका वर्ग थेट घाऊक बाजारात येऊन आंबा खरेदी करीत आहे.

फळे बाजार
मोसंबी*११५० रु. पेटी
लिंबू* १७५० रु. पोते दहा किलो
द्राक्ष*२५ रु. (एक किलो)
पेरू*३२५ रु.( एक किलो)
सफरचंद परदेशी*२१५० रु.( एक पेटी)
सफरचंद देशी*१५०० रु.( एक पेटी)
अननस*२२५ रु. (एक डझन)
कलिंगड* ४०० रु. (दहा नग)
आंबा हापूस* ५०० (१ बॉक्स दीड डझन)
आंबा मद्रास* २७५० पेटी (पाच डझन)
आंबा मद्रास पायरी*३५० (एक डझन बॉक्स)
---------------
चौकट
मिरचीच्या दरात किंचित घट
कोल्‍हापूर, ता. २४ ःउन्हाळा असल्याने नवीन चटणी करण्यासाठी घरगुती ग्राहकांकडून मिरचीची खरेदी केली जात आहे. त्यानुसार ब्याडगी मिरची व जवारी मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. पावसाळी वातावरणामुळे मिरचीच्या मागणीत घट झाली. परिणामी भाव किंचित कमी झाले आहेत.

ब्याडगी*६३० रु.
रेशीमपट्टा* ५९० रु.
काश्मीर मिरची* ५४० रु.
संकेश्वरी*१००० ते १४०० रु.
तेजा*२५० रु.
जवारी मिरची*२७० रु.
सिजेंटा ब्याडगी*३९० रु.
-----------
चौकट
खाद्य तेलाचे दर स्थिर
खाद्य तेलाच्या बाजार भावात फारसा फरक पडलेला नाही. बहुतांशी भाव जैसे थे आहेत. यात सरकी १८० रुपये, सनफ्लॉवर २१५ रुपये, सोयाबीन १८५ रुपये, शेंगतेल १८५ रुपये असे एक लिटर तेलाचे भाव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student suicide attempt: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT