कोल्हापूर

राष्ट्रवादी विश्‍लेषण

CD

घड्याळ चिन्ह
--
राष्ट्रवादीसमोर ‘संकल्प’पूर्तीचे आव्हान
...................
परिवार संवाद यात्रेने कार्यकर्ते चार्ज ः २३ वर्षांत कमावले कमी, गमावले जास्त
....................
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. २४ ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेची सांगता शनिवार कोल्हापुरात विराट ‘संकल्प’ सभेने झाली. सभेमुळे कोल्हापूरच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ‘रिचार्ज’ झाला असला तरी आगामी निवडणुकींचा विचार करता आणि जिल्ह्यातील पक्ष संघटन बघता ‘संकल्प’पूर्तीचे पक्षांसमोर आव्हान असेल.
कोल्हापूर जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यात दोन खासदार आणि पाच आमदार या पक्षाचे होते. २३ वर्षांचा विचार केला तर या कालावधीत पक्षाने कमावले कमी पण गमावले जास्तच. आज पक्षाचा एकही खासदार नाही, २०१४ ला आघाडीच्या राजकारणात या जागा पक्षाला मिळतील, का नाही? याबाबत सांशकता आहे. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील वगळता इतर विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण? हा पक्षांसमोर प्रश्‍न असेल. जिल्हा बँकेत पक्षाची एकहाती सत्ता असली तरी तिथेही काँग्रेसशिवाय काही करता येत नाही.
जिल्हा परिषद, महापालिकेत यापूर्वी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्याशिवाय पक्षाला सत्तेत जाता येत नाही अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादीसमोरचे आव्हान असेल.
तपोवन मैदानावर काल झालेल्या विराट सभेतून पक्षाची ताकद कळाली; पण ही ताकद मतांत परिवर्तन करणे हे पक्षांसमोर आव्हान असेल. मंत्री मुश्रीफ यांच्या नेटक्या नियोजनामुळे ही सभा मोठी झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘ऊर्जा’ आहे. त्यामुळे या सभेला गर्दी झाली. मात्र, जिल्ह्यात प्रभावी असे पक्ष संघटन दिसत नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये तर विधानसभेसाठी आर. के. पोवार यांच्यापुढे नांव जात नाही. शाहूवाडी, कोल्हापूर दक्षिण, शिरोळ या तीन मतदारसंघात पक्षांकडे विधानसभा लढवेल, असा ताकदीचा उमेदवार नाही. इचलकरंजीत पक्षांतर्गतच दोन गटांत वर्चस्ववाद आहे. राधानगरीत माजी आमदार के. पी. पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या पाहुण्यातच टोकाची ईर्ष्या आहे. हातकणंगलेत ‘जनसुराज्य’चे माजी आमदार राजीव आवळे यांच्या रूपाने तगडा उमेदवार मिळाला; पण त्यांच्या मतदारसंघात श्री. पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची त्यांची तयारी असूनही त्यासाठी कोण पुढाकार घेत नाही.
.............
दोन तालुक्यातच पक्ष मजबूत
कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या रूपाने पक्षाची मोठी ताकद आहे. मात्र, कागल नगरपालिकेत त्यांना काठावरचे बहुमत आहे. याच मतदारसंघातील मुरगूड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आहे. गडहिंग्लज तालुक्यात पक्ष संघटन बऱ्यापैकी असूनही नगरपालिकेवर जनता दलाची सत्ता आहे. चंदगडमधील वेगळ्या राजकीय परिस्थितीतून २०१९ ला पक्षाचा आमदार झाला; पण २०२४ ला पुन्हा ही जागा राखण्याचे आव्हान असेल. कागलमध्ये श्री. मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी रान उठवले आहे, परिणामी श्री. मुश्रीफ यांना मतदारसंघातूनच बाहेर पडता येईल का नाही? अशी स्थिती आहे.
..................
कार्यकर्त्यांची फौज पण...
पक्षात कोल्हापूर शहरासह काही तालुक्यात दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची चांगली फौज आहे. मात्र, घराणेशाहीच्या नादात या कार्यकर्त्यांना संधी देताना नेतृत्वाचा कस लागतो. तेच तेच उमेदवार आणि तिच घराणी याचाही कार्यकर्त्यांच्या तयारीवर परिणाम होतो. नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे सूतोवाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी झालेल्या सभेत केले असले तरी कोल्हापुरात याची अंमलबजावणी होईल का? हा प्रश्‍न आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT