कोल्हापूर

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी गगनबावडा तहसिलदाराना निवेदन

CD

00918
गगनबावडा : गगनबावडा येथे शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळ्यासाठी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन देताना सरपंच मानसी कांबळे, विनोद प्रभूलकर, तानाजी पाटणकर आदी.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी
गगनबावडा तहसीलदाराना निवेदन 
असळज, ता. २ : गगनबावडा या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा साकारावा, अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी आज केली. याबाबतचे निवेदन गगनबावड्याचे तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, गगनबावडा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक संपन्नतेचा मोठा वारसा आहे. किल्ले गगनगड हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ला याच तालुका ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेली ही भूमी आहे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख अमात्य रामचंद्रपंत बावडेकर यांची ही जहागिरी आहे. अशा या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या गगनबावडा येथे छत्रपती शिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा व्हावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे अनेक संघटनांनी शासन दरबारी केली आहे. पण याकडे राजकीय पक्षांकडून तसेच प्रशासनाकडून दुर्लक्ष झालेले आहे. गगनबावडा येथे शिवछत्रपतींचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यास निधीसह मान्यता द्यावी. सदरच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून आठवडाभरात सकारात्मक पाऊल उचलावे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तालुक्यातील शिवभक्त तीव्र आंदोलन करतील असा.
या वेळी गगनबावड्याच्या सरपंच मानसी कांबळे, माजी सभापती तानाजी पाटणकर, विनोद प्रभूलकर, ग्रामपंचायत सदस्या वृंदा पाध्ये, वैदेही पाध्ये, संतोष गावडे, चिमाजी खेतल, संजय पोतदार, विलास पडवळ, अमर भांबुरे, शहाबुद्दीन डांगे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT