कोल्हापूर

चंदगड अर्बनच्या १३ जागांसाठी ३२ उमेदवार

CD

चंदगड अर्बनच्या १३ जागांसाठी ३२ उमेदवार
अर्ज माघारी नंतरचे चित्र, बिनविरोधची चर्चा निष्फळ
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : येथील चंदगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा जागांसाठी सहा अपक्षांसह ३२ उमेदवार रिंगणात आहेत. आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले. सोमवारी ( ता. ६ ) चिन्हांचे वाटप होणार असून त्यानंतर प्रचाराला गती येणार आहे. १९ तारखेला मतदान आहे.
बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले मात्र त्याला यश आले नाही. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३ जागेसाठी तब्बल ३२ उमेदवार रिंगणात राहिले. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी आनंद ओऊळकर, विजय कडूकर, दयानंद काणेकर, सुनील काणेकर, हरीश जाधव, सुरेश जुवेकर, समीर नाईकवाडी, संदीप पाटील, अरुण पिळणकर, सचिन बल्लाळ, अमीर मुल्ला, अलीसाहेब मुल्ला, फिरोज मुल्ला, संतोष वणकुंद्रे, सुधीर वाटंगी, महादेव वांद्रे, सुरेश सातवणेकर, बाबू बाळा हळदणकर, शिवानंद हुंबरवाडी यांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधीसाठी अर्चना ढेरे, सुधा नेसरीकर, माधवी मुळीक, पूजा शिंदे यांची उमेदवारी आहे. इतर मागासमधून राजेंद्र परीट व आनंद हळदणकर, अनुसूचित जाती जमातीमधून शिवाजी कार्वेकर, प्रमोद कांबळे, विश्वनाथ कांबळे, श्रीकांत कांबळे, शंकर देशमुख तर भटक्या विमुक्त जाती जमाती मधून अरुण गवळी व विठ्ठल गोंधळी यांची उमेदवारी आहे. सोमवारी चिन्हांचे वाटप होणार आहे त्यानंतर प्रचाराला गती येईल १९ तारखेला मतदान व २० तारखेला मतमोजणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT