कोल्हापूर

डेव्लपमेंट फुटबॉल लिग आजपासून

CD

डेव्लपमेंट फुटबॉल लिग आजपासून
शिवराज युनायटेड ट्रॉफी; रोज सायंकाळी दोन सामने, अर्ध्या लाखाची पारितोषिके
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे उद्या (ता. १७) पासून डेव्हलपमेंट फुटबॉल लिग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. २३ मे अखेर ही स्पर्धा आहे. रोज सायंकाळच्या सत्रात दोन सामने होणार आहेत. स्पर्धेत सहा संघाचा सहभाग आहे.
एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर होणाऱ्या शिवराज युनायटेड ट्रॉफीसाठी रोख अर्ध्या लाखांची पारितोषिके आहेत. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
कुमार आणि युवा खेळाडूंना अधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळावा हाच या स्पर्धेचा हेतू आहे. पंधरा, अठरा आणि एकवीस वर्षाखालील खेळाडूंचा समावेश संघात आहे. पंधरा दिवस निवडलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गोव्याचे कार्लोस गोम्स यांनी मार्गदर्शन केले. बोलीद्वारे या खेळाडूंचे फिजिक जिम वॉरियर्स, गुफा गार्डीयन्स, संघर्ष फायटर्स, दादा जीएम चँलेजर्स, इफा लायन्स, युनायटेड रायझिंग स्टार्स अशा सहा संघात विभागणी केली आहे. खेळाडूंना इंडियन सुपर लिग संघाचे किट दिले आहे.
सायंकाळी साडेचार वाजता शिवराज शिक्षण संकुलाचे प्रा. किसनराव कुराडे यांच्याहस्ते स्पर्धेला प्रारंभ होईल. तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे, तानाजी देवार्डे, सिंकदर यळकुद्रे, गुंडू पाटील, आमीर नदाफ, रतन सुतार उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सामन्यात विजयी संघातील खेळाडूस सामनावीर तर पराभूत संघातील खेळाडूस लढवय्या म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरव केला जाणार आहे. फुटबॉल शौकिनांनी उपस्थित राहून नवोदित खेळाडूंना प्रोत्याहन द्यावे, असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, शिवराजचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले आहे. समन्वयक ओमकार घुगरी, सागर पोवार नियोजन करीत आहेत.
-------------
आजचे सामने
सायंकाळी ४ वा. संघर्ष फायटर्स वि. फिजिक जिम वॉरियर्स
सायं. ५.०० वा. दादा जीएम चॅलेंजर्स वि. गुफा गार्डियन्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT