कोल्हापूर

पुढील आठवड्यापासून प्रवेश प्रक्रिया

CD

पुढील आठवड्यापासून प्रवेश प्रक्रिया
पदवी अभ्यासक्रम : बीएस्सी, बीकॉमसह व्यावसायिक कोर्सेसला कल; सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : बारावीचा आऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. पारंपारिक कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. काही वर्षात प्रवेशासाठी शहरात अनेक नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेच सर्वच अभ्यासक्रमांत अनुदानितसह विनाअनुदानित पर्याय वाढल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश सोपा झाला आहे.
बॅचलर ऑफ सायन्स (बीएस्सी), बॅचलर ऑफ कॉमर्ससह (बी कॉम) व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल आहे. बारावीची गुणपत्रिका उपलब्ध झाल्याने प्रवेश प्रक्रियेला गती येईल. सीईटीचा निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. शहरातील महविद्यालयात सुमारे तीन हजार प्रवेशक्षमता आहे.
बारावीचा काल (ता. २५) ऑनलाईन निकाल जाहीर झाला. सुमारे साडे तीन हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावी विज्ञाननंतर सर्वाधिक मार्क असणारे विद्यार्थी वैद्यकिय, आभियांत्रिकी शिक्षणाकडे वळतात. त्यासाठी होणारी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) निकालाची प्रतीक्षा आहे. बीएससीसाठी शिवराज आणि घाळी अशा दोन पर्यायात साधना महविद्यालयाची भर पडली आहे. नोटाबंदीपासून कॉमर्स कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
व्यवस्थापन, संगणकाशी निगडीत बीबीए, बीसीए, बीसीएस या व्यावसाईयिक अभ्यासक्रमाकडेही दशकभरात नोकरीच्या संधीमुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने वळत आहेत. विद्यार्थी विविध अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांची माहिती घेत आहेत. महाविद्यालयांनी प्रवेशाची तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रवेश कक्ष सुरु केला आहे. नव्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मदत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
--------------
चौकट
प्रवेश क्षमता दृष्टीक्षेपात (कंसात विनाअनुदानित प्रवेशक्षमता)
महाविद्यालय सायन्स कॉमर्स आर्टस बीबीए बीसीए बीसीएस
शिवराज महाविद्यालय १२० (२४०) १२० (२४०) २४०(१२०) (८०) (८०) (८०)
डाँ. घाळी महाविद्यालय १२० (१२०) १२०(१२०) ३६० (८०) - -
कला वाणिज्य महाविद्यालय - (१२०) १२० - - -
निओरा महिला महाविद्यालय - (८०) (८०) - - -
साधना महाविद्यालय (१२०) (१२०) - - - -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT