कोल्हापूर

आधुनिक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे; कबाडे

CD

02353, 02354
हुपरी : हुपरीभुषण य. रा. नाईक स्मृतीदिनानमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सुरेश कबाडे. समोर उपस्थित शेतकरी.


आधुनिक शेतीला प्राधान्य
देणे गरजेचे : सुरेश कबाडे
हुपरी : नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेती करणे आता गरजेचे असून ती काळाची गरज आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपारिक ऐवजी आधुनिक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नियोजनानुसार उसाची शेती केल्यास भरघोस पीक मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ऊस पिक तज्ञ, ऊसभूषण पुरस्कार विजेते सुरेश कबाडे यांनी येथे केले. येथील हुपरीभुषण य. रा. नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘एकरी १०० टन ऊस पिक वाढ’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पैसाफंड सहकारी बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब भोजे होते. चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, यशवंत औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सदाशिव वाईंगडे, संचालक विलासराव नाईक, पैसाफंड बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक, दिनकरराव ससे आदी प्रमुख उपस्थित होते.
सुरेश कबाडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती मध्ये सातत्यपूर्ण एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी सरीतील अंतर पाच फूटाचे ठेवणे तसेच बियाणे ८६०३२, ऊसाची लावण करताना फुटाला एक ऊस ठेवणे आदीसह अनेक महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली. दिनकरराव ससे यांनी प्रास्ताविक केले. नानासाहेब भोसले यांना सूत्रसंचलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT