कोल्हापूर

कुत्रा हल्ला...फॉलो अप

CD

भटक्या कुत्र्याच्या दहशतीप्रश्नी
इचलकरंजी महापालिका ढीम्मच
इचलकरंजी, ता. २६ : भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात वृद्धेचा जीव गेला असतानाही महापालिका प्रशासन मात्र ढीम्म असल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न शहरातील सर्वच भागांत गंभीर असताना केवळ कागदोपत्री उपाययोजना करीत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या जिवाची पर्वा नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे, की काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी प्रांत कार्यालयावर शस्त्र परवाना देण्याची मागणी केली होती. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने कोणताच बोध घेतलेला नाही. जर याबाबत ठोस कार्यवाही केली असती, तर वृद्धेचा जीव वाचला असता. आज सुटीचा दिवस असल्याने गंभीर घटना घडल्यानंतरही महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळ परिसरात जाऊन माहिती घेण्याची तसदी घेतली नाही. किंबहुना, या प्रश्नाबाबत गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे.
भटक्या कुत्र्यांना कायद्याने मारता येत नाही. त्यामुळे निर्बीजीकरण व लसीकरणावर भर दिला जात आहे. यातून कुत्र्यांचा हिंस्त्रपणा कमी होत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. पण, ताजी घटना लक्षात घेता निर्बीजीकरणापेक्षा भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव रोखण्यासाठी तत्काळ पर्याय न शोधल्यास पुढील काळात नागरिकांतून तीव्र पडसाद उमटण्याची भीती व्यक्त होत आहे.
......

निर्बीजीकरण निविदा आणि ठेकेदारांची पाठ
महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची निविदा काढली आहे. पण, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. यामागे नेमके कारण काय, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT