कोल्हापूर

फळबाजारात उन्हाच्या झळा गडद

CD

05671
इचलकरंजी : १) हंगामी पांढऱ्या कांद्याची आवक बाजारात सुरू झाली आहे.
05672
२) देवगड हापूस आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे.

फळ बाजारात उन्हाच्या झळा गडद
दर दुपटीने वाढले; हंगामी पांढऱ्या कांद्याची आवक
इचलकरंजी, ता. २३ : उन्हाच्या झळा फळ बाजारात गडदपणे जाणवत आहेत. फळांच्या मागणीत वाढ झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. प्रतिकिलो काही फळांचे दर दुपटीने वाढले आहेत. केळ्यांचे दर अजूनही हाताबाहेर आहेत. हंगामी कलिंगड, द्राक्षाची आवक मुबलक असून मागणी अधिक आहे. सफरचंदांची आवक मरगळली असताना मागणी वाढल्याने दरात मोठी वाढ होत आहे. बोराची आवक अद्याप संपता संपेना झाली आहे.
धान्य बाजारात वाढते तांदळाचे दर वाढतच आहेत. गव्हाच्या दरात आणखीन घट झाली आहे. खाद्यतेलाचे कमी झालेले दर स्थिर असून सूर्यफुलाचे दर कमी होण्याचा वेग जास्त आहे. येत्या दिवसांत खाद्यतेलाचे भाव पूर्णतः आटोक्यात येतील. थंडीमुळे थांबलेले फुलांचे उत्पादन आता सुरू झाले आहे. तापमान पोषक बनल्याने बाजारात आवक वाढली आहे. भाजीपाला बाजाराला उन्हाचा चटका बसलेला दिसून येत नाही. टोमॅटोने हळूहळू भाव खाण्यास सुरुवात केली आहे. आतापासूनच लिंबूचे दर मात्र होरपळले आहेत. या आठवड्यात प्रतिशेकडा १५०-२०० रुपयांची कमाल वाढ झाली आहे. त्यामुळे मागणी थोडी मंदावली आहे. हंगामी पांढऱ्या कांद्याची आवक असून मागणीला जोर आहे. पुढील तीन महिने हा कांदा बाजारात असतो.

प्रतिकिलो रुपये भाज्यांचे दर : टोमॅटो- २० ते २५, दोडका- ५० ते ६०, वांगी- ३० ते ४०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -५० ते ६०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, पांढरा कांदा-३०, लसूण- ८० ते १००, आले- ६० ते ८०, लिंबू- ३०० ते ६०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- ४० ते ५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा - ७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ८० ते १००, रताळे -३० ते ४०, दुधी -३० ते ४०, पालेभाज्या ८ ते १० रुपये, शेवगा ५ रुपये नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१२५ ते १३०, शेंगतेल - १७५ ते १८०, सोयाबीन - १३० ते १३५, पामतेल - ११० ते ११५, सूर्यफूल -१३५ ते १४०.
- - --- - - -
फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध- २५०, गुलाब - २०० ते २५०, गलांडा- ८० ते १००, शेवंती- १४० ते १५०, १६० ते १८०, आष्टर - १५० ते २००.
- - - -- - -
फळे : सफरचंद- १८० ते २००, संत्री - १०० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १०० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरू-३० ते १००, खजूर - १५० ते २००, द्राक्षे - ८० ते १००, कलिंगड -५६ ते ६०, पपई- ३० ते ५०, अननस - ८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी -१०० ते १२०, स्ट्रॉबेरी- ५० ते ६० (लहान बॉक्स), चिंच- १०० ते १४०.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ४८, बार्शी शाळू- ४० ते ५०, गहू- २८ ते ३५, हरभराडाळ -५८ ते ६३, तूरडाळ- १०८ ते ११५, मूगडाळ-९५ ते १००, मसूरडाळ- ७६ ते ७८, उडीदडाळ- ९० ते १००, हरभरा- ५२ ते ५६, मूग-८५ ते ९३, मटकी- १३० ते १३५, मसूर- ७०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी-७५ ते ८३, हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.
- - - - - - - - - - - -
हापूस आंब्याचे दर्शन
अस्सल चवीची ख्याती असलेल्या देवगड हापूस आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे. देवगड हापूसचे आगमन बाजारात झाले असले तरी जास्त दरामुळे तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. मार्चपासून आंबा जास्त प्रमाणात बाजारात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या देवगड हापूस आंब्याचा डझनाला दर २५०० रुपये आहे. येत्या काही दिवसांत शहरात रत्नागिरी, कर्नाटक हापूसही दाखल होईल.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT