कोल्हापूर

राष्ट्र सेवा दलाचे योगदान अभूतपूर्व

CD

06162
चंदूर : येथील बाल आनंद संस्कार शिबिर समारोपप्रसंगी विकास अडसूळ यांनी मार्गदर्शन केले.
----------
राष्ट्र सेवा दलाचे योगदान अभूतपूर्व
विकास अडसूळ; चंदूर येथे बाल आनंद संस्कार शिबिराचा समारोप
इचलकरंजी, ता. २५ : राष्ट्र सेवा दलाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अभूतपूर्व आहेच. पण आताही समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक राष्ट्र सेवा दल घडवते, असे मत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांनी व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दलाच्या संजीवन विद्यामंदिर, चंदूर येथील बाल आनंद संस्कार शिबिर समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राष्ट्र सेवा दल, इचलकरंजीच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील म्हणाल्या, ‘किशोरवयीन मुलांच्या मनोभूमीवर संविधानिक मुल्यांची पेरणी करणारे हे शिबिर यशस्वी होणे यात शिक्षक, पालक, बालक आणि लोकसहभाग यांचा सुंदर मिलाफ घडून आला आहे.’ मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर म्हणाले, ‘या शिबिरातून आदर्श नागरिक घडणार आहेत. व्यावसायिक शिबिरांना फाटा देवून तळागाळातील मुलांपर्यंत कौशल्ये आणि संस्कार पोहचवणेचे महत्कार्य तरुणाईकडून घडते आहे, हे सुचिन्ह आहे.’
मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र प्रदान देले. मुलांनी झांज, लेझीम, कॅलेस्थेनिक्स, समुहगीते सादर केली. स्मिता पाटील कलापथकाने ''हर घर संविधान'' पथनाट्य सादर केले. शिबिरात प्रशिक्षक म्हणून दामोदर कोळी, वैभवी आढाव, ओम कोष्टी, साद चांदकोटी,स्नेहल माळी, अमोल पाटील आदिंनी काम केले. सरपंच स्नेहल कांबळे, महंमद मकुभाई, उपसरपंच संजय जिंदे, वैशाली पाटील, गजानन जगताप, नौशाद शेडबाळे आदी उपस्थित होते. इंद्रजीत कदम यांनी प्रास्ताविक केले. मैदानप्रमुख रोहित दळवी यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन सुखदेव पाटील यांनी केले. लताराणी पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT