कोल्हापूर

पोलिस वृत्त

CD

पादचारी महिलेस मोटारसायकलची धडक

इचलकरंजी : पादचारी महिलेस मोटारसायकलने धडक देवून जखमी केल्याप्रकरणी एकावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद सुभाष मोकाशी (रा.जनवाड ता.चिक्कोडी जि.बेळगाव) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मुमताज अमिन जमादार (वय ५२, रा.आसरानगर) यांनी दिली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास मुमताज या वडगाव बाजार समितीसमोरून पायी निघाल्या होत्या. त्यावेळी प्रसाद मोकाशी यांनी मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर प्रसाद याने जखमी मुमताज यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल न करता तिथून तो पसार झाला. मुमताज यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीनुसार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून जखमी केल्याप्रकरणी प्रसाद मोकाशी याच्यावर गुन्हा दाखल झाला. 
-------
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
इचलकरंजी : बांधकाम परवाना व्यतिरिक्त अतिरिक्त बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमर जनार्दन भंडारे (रा.कबनूर) असे त्याचे नाव आहे. ही घटना कबनूर येथील नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या गट क्रमांक १३५ मध्ये घडली. समाविष्ट गट क्रमांक मध्ये भंडारे यांची बांधकाम केलेली इमारत आहे. या ठिकाणी महानगरपालिकाकडून बांधकामासाठी बांधकाम परवाना घेतला होता. मात्र त्यांनी परवाना व्यतिरिक्त या इमारतीच्या ठिकाणी अतिरिक्त बेकायदेशीरपणे बांधकाम केले. हे महापालिकेच्या निदर्शनास आले. सूर्यकांत चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार भंडारे यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT