कोल्हापूर

पोलिस वृत्त

CD

इचलकरंजीत पैसे देवाण-घेवाणवरून मारहाण
इचलकरंजी : येथील गांधी पुतळा चौकात तिघांनी एकाला पैसे देवाण-घेवाणच्या कारणावरून मारहाण केली. या मारहाणीत संजय बाबू बागेवाडी (वय ५२, रा. इचलकरंजी) जखमी झाले. या प्रकरणी विवेक शिंदे (रा. इचलकरंजी), सुधीर हिंगमिरे (रा. तारदाळ) यांच्यासह एक अनोळखी अशा तिघांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गांधी पुतळा चौकातील एका मेडिकलसमोर संजय बागेवाडी यांना पैशांच्या देवाण-घेवाणवरून शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर लोखंडी सळईने शिंदे याने त्यांना मारहाण केली, तर हिंगमिरे याने लाकडी काठीने मारहाण केली. तसेच, त्यांच्या एका साथीदाराने खाली पाडून बागेवाडी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. बागेवाडी यांच्या फिर्यादीनुसार तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
--
हातकणंगलेत मुलाला दुचाकीस्वाराची धडक
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथे खेळणाऱ्या सातवर्षीय मुलाला एक दुचाकीस्वार जोराची धडक देऊन पसार झाला. अपघातात अहिल हायुल शेख (वय ७) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी दुचाकी चालकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चंदूर येथे शाहूनगर गल्ली क्रमांक आठ येथे अहिल खेळत होता. या वेळी चंदूर रोडकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराने अहिलला जोराची धडक दिली. या अपघातात अहिलच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. या प्रकरणी हायुल फकीर शेख (वय ३०) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT