कोल्हापूर

जुगार अड्डा करवाई

CD

रांगोळीत जुगार अड्ड्यावर छापा

३ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी, ता.५ : रांगोळी (ता. हातकणंगले) येथे उघड्यावर सुरू असणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात तरुणांवर गुन्हा दाखल करून मोबाईल, मोटरसायकलीचे साहित्य असा एकूण ३ लाख २६ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केली.
अभिषेक संजय देसाई (वय २४), रणजीत रतन माने (वय २६), सुरज महावीर पाटील (वय २८),गजानन अण्णाप्पा अहिवळे (वय ३०), अब्बास तातोबा माने (वय ३०), महावीर प्रकाश शेटे (वय ३७), गिरीश भरत शेट्टी (वय २९, सर्व रा. रांगोळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागातील रांगोळी हे एकमेव गाव येते. याठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार आज सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास अभिषेक देसाई यांच्या शेतालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत आठ ते दहा जण जुगार खेळताना मिळून आले. यावेळी अनेकजणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून ३५ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल, २ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख २६ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT