कोल्हापूर

शिरोळ नगरपरिषद, माने प्रतिष्ठानचा नरदेकर, गावडे यांना पुरस्कार जाहीर

CD

05478
आण्णासाहेब गावडे
05477,
धनाजी नरदेकर

शिरोळ नगरपरिषद, माने प्रतिष्ठानचा
नरदेकर, गावडे यांना पुरस्कार जाहीर
शिरोळ, ता. २२ : येथील दलित मित्र डॉ. अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगरपरिषद यांच्यातर्फे देण्यात येणारा शिरोळ भूषण पुरस्कार अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील-नरदेकर व बाल शिवाजी मंडळाचे सचिव आणि स्वीकृत नगरसेवक प्रा. अण्णासाहेब माने-गावडे यांना जाहीर झाला. ही माहिती नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ‘‘डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त, दिनांक १ जून २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौकात शिरोळ भूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नरदेकर व प्रा. माने-गावडे यांना गौरवण्यात येणार आहे. अन्य गुणवंतांचाही सत्कार होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन होणार आहे.’’
या वेळी बजरंग काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, डॉ. अशोकराव माने शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिवाजीराव माने देशमुख, सुनील इनामदार, दगडू माने, बबन बन्ने, सागर कोळी, विजय खातेदार, पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT