कोल्हापूर

कोरोचीत बैल सजावट स्पर्धेत ऋषिकेश शिंदे यांचा बैल प्रथम

CD

03557
कोरोची : बैलजोडीचे मालक ऋषिकेश शिंदे यांना बक्षीस देताना सरपंच डॉ. संतोष भोरे, सावकर हेगडे, अमित काकडे, दीपक पाटील, अभिनंदन पाटील आदी.

बैल सजावट स्पर्धेत
शिंदे यांचा बैल प्रथम
कबनूर, ता. ७ : कोरोची (ता. हातकणंगले) येथील रेसर ग्रुपतर्फे बेंदूर सणानिमित्त आयोजिलेल्या बैल सजावट स्पर्धेत ऋषिकेश शिंदे यांच्या मालकीच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावला. बेंदूर सणानिमित्त रेसर ग्रुप व बेंदूर उत्सव समितीतर्फे बैल सजावट स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद कुमार व कन्या मराठी शाळा पटांगणात करण्यात आले होते. त्याचे उद्‍घाटन सरपंच डॉ. संतोष भोरे व पोलिस पाटील सावकर हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा ‘अ’ आणि ‘ब’ गटात झाली. स्पर्धेमध्ये २३ शेतकऱ्यांच्या बैलांचा सहभाग होता.
‘अ’ गटात ऋषिकेश शिंदे यांच्या बैलाचा प्रथम क्रमांक, सोमेश शिंदेंच्या बैलाचा द्वितीय क्रमांक, रिद्धी पाटील यांच्या बैलाचा तृतीय क्रमांक आला आणि ‘ब’ गट बैल सजावट स्पर्धेत सौरभ भंडारी यांच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रतीक शिंदे यांच्या बैलाने द्वितीय क्रमांक, आदित्य चावरे यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेचे इचलकरंजी संस्थापक अध्यक्ष अमित काकडे यांच्याकडून सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी उपसरपंच आनंद लोहार, ग्रामपंचायत सदस्य विकी माने, संजय शहापुरे, तृणाल कुंभार, माजी सरपंच डी. बी. पिष्टे, अभिनंदन पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत चावरे, सर्जेराव माने, अक्षय शेट्टी, पुरंदर पाटील, प्रा. रवींद्र पडवळे, राजू पाटील, अभिजित गुरव, संजय तोरस्कर, सौरभ भंडारे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT