03757
कोपार्डे : गणेश नाळवा येथे बाजूपट्टीवर रुतलेला अवजड ट्रक.
03756, 03758
कोपार्डे : अपघाताला कारण ठरणाऱ्या बाजूपट्ट्या.
बाजूपट्ट्यांमुळे अपघाताला निमंत्रण
कोपार्डे येथे ट्रक रुतला; वारंवार वाहतुकीची कोंडी
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ११ : कोपार्डे येथे बाजूपट्ट्या अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. माती टाकून बाजूपट्टी केल्याने आज बाजूपट्टीवर ट्रक रुतला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान, हे काम अर्धवट सोडल्यामुळे ही बाजूपट्टी अपघाताला निमंत्रण ठरत आहे. तातडीने मुरूम टाकून बाजूपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.
कोपार्डे-कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या रूंदीकरणासाठी व बाजूपट्ट्यांच्या मजबुतीकरण कामाला सुरुवात केली आहे; पण पावसामुळे रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या मुरूम मातीमुळे या राष्ट्रीय महामार्गाला पाणंद रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी चिखल तयार झाला आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीला धोकादायक ठरत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा ते कळेदरम्यान वृक्ष काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता दहा मीटरचा होणार असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटर रूंदीकरण व त्यानंतर बाजूपट्टी यासाठी मातीमिश्रित मुरूम टाकून पिचिंगचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी मोठमोठ्या काढण्यात आलेल्या वृक्षांचे बुंधे हलवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अवजड अथवा चारचाकी वाहन रस्त्यावरून खाली उतरले आणि पुन्हा रस्त्यावर आले की, पावसामुळे झालेली चिखलमाती मुख्य डांबरी रस्त्यावर येत आहे. मुसळधार पाऊस नसल्याने रस्त्यावर चिखल तयार होत आहे.
------------------
कोट
बाजूपट्टीवर मुरमाऐवजी माती टाकल्यामुळे चिखल होऊन दुचाकी घसरणे, तसेच चारचाकी वाहने चिखलामुळे घसरत असल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग धोकादायक ठरत आहे.
- व्ही. जी. पाटील, माजी अध्यक्ष, शिवसेना- करवीर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.