कोल्हापूर

कागल : कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन निदर्शने

CD

04968

कागल : सीमा तपासणी नाका सुरू करू नये, यासाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने आंदोलन केले.
...

खासगी सीमा तपासणी नाका सुरू झाल्यास चक्काजाम करू

जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचा इशाराः कागलच्या चेक पोस्टवर निदर्शने

कागल, ता. ८ : कागल येथील राज्य परिवहन विभागाचा सीमा तपासणी नाका खासगीकरणातून चालू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तपासणी नाक्याला आमचा विरोध असून हा नाका सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास उग्र आंदोलन करू. चक्काजाम करू. त्यातूनही हा नाका सुरू करण्याचा प्रयत्न केला तर ज्याप्रमाणे कोल्हापुरातील आयआरबीला हाकलून लावले त्याचप्रमाणे कागलचा तपासणी नाक्याला बंद पाडू. तसेच वेळ पडली तर महाराष्ट्र राज्य वाहतूकदार संघाच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य लॉटरी ऑपरेटर्स संघाचे पदाधिकारी प्रकाश गवळी, कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने नाक्यावर काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली. चेक पोस्ट नाक्याचे व्यवस्थापक निलेश भोसले यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
कोल्हापूरचे जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, ‘केंद्र शासनाने जीएसटी लागल्यानंतर राज्यांच्या सीमेवरील सर्व आरटीओ सीमा तपासणी नाके बंद केले जातील असे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सर्व राज्यांना सीमा तपासणी नाके बंद करण्याबाबत सूचित केलेले आहे. कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, जळगाव आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात खासगी सीमा तपासणी नाका बसवण्याचा या सरकारचा डाव आहे. हा डाव आम्ही उधळून लावणार आहोत. पादचारी सोडला तर सर्व वाहने कागलच्या सीमा तपासणी नाक्यावरून जाणार आहेत. सर्वच वाहनांना सेवा शुल्क द्यावा लागणार आहे. गोरगरीब वाहन चालक आपले कुटुंब चालवण्यासाठी हा व्यवसाय करतो. गाडी ओव्हरलोड आली तर बावीस हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. कोट्यवधीचा टॅक्स आम्ही शासनाला देतो. आगाऊ टॅक्स भरत असताना देखील सुविधा मात्र काहीच मिळत नाहीत. ’
आंदोलनात उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सेक्रेटरी हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर यांच्यासह बाळासाहेब कलशेट्टी, राजेंद्र दांगडे, अरुण जाधव, महेश पाटील, मल्हारी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने लॉरी ऑपरेटर्स या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT