कोल्हापूर

कागल : पालिका कर्मचार्‍यांचा आंदोलनाचा इशारा

CD

सहायक वेतन अनुदान न मिळाल्यास
पालिका कर्मचाऱ्यांचे २८ ला आंदोलन
कागल, ता. २६ : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सहाय्यक वेतन अनुदानची रक्कम २७ एप्रिलपर्यंत न मिळाल्यास २८ एप्रिलला नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद कामगार संघटनेने दिला. अशा मागणीचे निवेदन संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे म्हणून सहायक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत नगरपरिषदांना मिळण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी केली आहे. याबाबत २० मार्चला मुख्यमंत्री यांच्या समक्ष मंत्रालयातील चर्चेवेळी प्रश्न मांडला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने शिक्षकांसाठी राबविण्यात येणारी शालांत सेवार्थ प्रणाली राबवून वेतन वेळेवर होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सण पगाराअभावी करता आला नाही. यामुळे नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांत असंतोष पसरला आहे. २७ एप्रिलपर्यंत सहायक वेतन अनुदान न मिळाल्यास २८ एप्रिलला नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करतील. ज्या नगरपरिषदा शासनाला वेतन अनुदानासंबंधीची माहिती वेळेवर देत नसतील त्यांना सहायक वेतन अनुदान आदा करू नये व अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT