07161
ई-मोबिलीटी क्षेत्रातील भारताचे
कार्य चांगले करण्याचा प्रयत्न
रमेश पसरीजा ः केआयटीत एसएई इंडिया कोल्हापूर चॅप्टरचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २० : एस.ए.ई. इंडिया हे मोबिलिटी तंत्रज्ञानासाठी भारतातील आघाडीचे संसाधन संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून मोबिलिटीच्या विषयात प्रॅक्टिकली काम करणारे सदस्य, तंत्रज्ञ,अभियंते, प्राध्यापक, विद्यार्थी शासकीय अधिकारी यांना एकत्रित करून या क्षेत्रातील कार्य अजून चांगले करण्याचा प्रयत्न ही संस्था करते; असे प्रतिपादन रमेश पसरीजा यांनी केले. ते केआयटीत एस.ए.ई .इंडिया कोल्हापूर चॅप्टरचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
एस.ए.ई. इंडिया भारतातील गतिशीलता उद्योगाच्या प्रगतीसाठी समर्पित भारतीय ना नफा अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक सोसायटी म्हणून नोंदणीकृत एसएई इंटरनॅशनलचा धोरणात्मक सहयोगी भागीदार आहे. हा एसएई इंडिया चॅप्टर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. केआयटीचा मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक फायद्यासाठी चॅप्टर चालवणार आहे; असे प्रास्ताविकात संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी सांगितले. एसएई इंडियाची माहिती एसएई मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य संजय निभंदे यांनी दिली. ‘भविष्यातील ई-मोबिलिटी’ विषयावर संजय निभंदे यांनी मार्गदर्शन केले. केआयटी संस्थेचे उपाध्यक्ष साजिद हुदली यांनी मनोगत व्यक्त केले.
एसएई इंडियाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर विभागाचे चेअरमन म्हणून डॉ. मोहन वनरोट्टी, सचिव म्हणून डॉ. उदय भापकर तर डॉ. आसिफ कुरेशी खजिनदार असतील. चॅप्टरच्या उद्घाटनप्रसंगी पश्चिम विभागाचे सहयोगी संचालक मोहन पाटील उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, अन्य विश्वस्तांचे प्रोत्साहन मिळाले. प्रा. जहिदा खान यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आसिफ कुरेशी यांनी आभार केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.