कोल्हापूर

पोलिस वृत्त पोलिस वृत्त

CD

कळंबा कारागृहात कैद्याचा मृत्यू
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असणारा कैदी रघुनाथ नारायण पाटेकर (वय ६७, रा. रत्नागिरी) याचा आज सीपीआरमध्ये मृत्यू झाला. त्याला चक्कर येण्याचा त्रास होता. चार दिवसांपूर्वी त्याला कारागृहातील दवाखान्यात दाखल केले, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव, हेड कॉन्स्टेबल कुंभार यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, याची फिर्याद कारागृहाचे प्रभारी अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
---------
अपघातात तिघे जखमी
कोल्हापूर : कसबा बावडा दुकान गल्ली रोडवर आज दुपारी दुचाकी व मोटार धडकेत तिघे जखमी झाले. यामध्ये शीतल संदीप पाटील (वय ३५), शेवंता विष्णू पाटील (वय ६५ रा. दोघी फुलेवाडी) व दुचाकीस्वार अजित गोसावी (वय २६, रा. वडणगे ता.करवीर) हे जखमी झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार झाले.
--------

कळंब्यात डंपरच्या धडकेत
दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) ते गारगोटी मार्गावर काल डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. अमित पांडुरंग आळवेकर (वय ३३, रा. दादू चौगलेनगर, कळंबा) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डंपरचालक संजय दिंडे (रा. सडोली खालसा, ता. करवीर) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
............
राजेंद्रनगरात दोघांकडून
एकास मारहाण

कोल्हापूर : थर्टी फर्स्टच्या रात्रीत राजेंद्रनगरात डोक्यात दगड मारल्यामुळे एक जण जखमी झाला. अभिजित राजेंद्र काळे असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धू जगताप आणि शुभम डवरी (दोघे रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ३१ डिसेंबरच्या रात्री पावणेबाराच्या सुमारास परिसरातील वॅट प्रकल्पाजवळ मोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करणाऱ्या दोघांना जखमी अभिजितने रोखले. याचा राग मनात धरून संशयित सिद्धू आणि शुभम (दोघे रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) यांनी अभिजितला दगडाने मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT