कोल्हापूर

इतरांची जाणीव ठेवून वाहने सुरक्षीत चालवा; दिपक पाटील

CD

इतरांची जाणीव ठेवून
वाहने सुरक्षित चालवा
दीपक पाटील; एसटी महामंडळ सुरक्षितता सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ‘‘एसटी बस सुरक्षित चालवणे जबाबदारीचे काम आहे. चालकांनी स्वतः सोबत एका गाडीत बसलेल्या प्रवाशांची जाणीव ठेवणे महत्त्‍वाचे आहे. त्यासाठी चालकांनी आरोग्य तंदुरुस्त ठेवणे तसेच व्यसनापासून दूर राहून कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. यातून अपघात कमी होण्यास मदत होणार आहे,’’ असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी येथे व्यक्त केले.
येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी महामंडळात सुरक्षितता अभियानास सुरुवात झाली. पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्‍घाटन झाले, या वेळी ते बोलत होते. विभाग नियंत्रक अनघा बारटक्के प्रमुख उपस्थित होत्या. हे अभियान २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
पाटील म्हणाले, ‘‘एखादा अपघात झाला त्यात कोणाला अपंगत्व आले किंवा कोणाचा जीव गेला, तर त्याच्या कुटूंबाला विपरित परिणाम भोगावे लागतात. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वाहन सुरक्षित चालवणे अपेक्षित आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळावे, वेगावर नियंत्रण ठेवून लक्षपूर्वक वाहन चालवणे गरजेचे आहे. यातून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.’’
बारटक्के म्हणाल्या, ‘‘एसटीच्या यंत्रशाळेतून बस या तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत याची खात्री करून चांगल्या स्थितीत बस सेवेसाठी द्याव्यात त्यासोबत एसटी चालकांनी ही आपल्या हातून अपघात होणार नाही याचा निश्चय करून अपघात शून्य सेवा देण्याचा संकल्प करावा.’’
वाहतूक अधीक्षक उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय निगडे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप ठोंबरे यांनी आभार मानले. या वेळी एसटी चालक, वाहक, यंत्रशाळा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा, अपहरणात वडिलांचा सहभाग; गुन्ह्यातली कार घराबाहेर, आईने पोलीसांवर सोडले कुत्रे

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

SCROLL FOR NEXT