कोल्हापूर

विद्यार्थ्यांनी गांधीजींचे विचार समजून घ्यावेत

CD

विद्यार्थ्यांनी गांधीजींचे
विचार समजून घ्यावेत
कल्याणराव पुजारी : शिवराजमध्ये गांधी विचारांचा जागर उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : महात्मा गांधी यांचा विचार विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्याचे आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात महात्मा गांधी मंचतर्फे आयोजित महात्मा गांधी विचारांचा जागर या उपक्रमाचा प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे अध्यक्षस्थानी होते.
श्री. पुजारी म्हणाले, ‘अहिंसक सत्याग्रह हा स्वराज्य शक्तीचा मार्ग आहे. ३५ कोटी भारतीय जनतेचे आत्मबळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रित करण्याचे महान कार्य गांधीजींनी केले. आपल्या देशात ब्रिटिशांनी मिठावर लादलेला जुलमी कर हा भारतीय जनतेवर अन्याय करणारा आहे. जनतेची पिळवणूक करण्याच्या या अन्यायी धोरणाला विरोध करण्यासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह पुढे स्वातंत्र्य चळवळीला खऱ्‍याअर्थी बळ देणारा ठरला. महात्मा गांधी यांनी केलेल्या महान कार्याचा आदर्श आज जगासमोर आहे.’
प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा. सुनील शिंत्रे यांची भाषणे झाली. शिवराजचे उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी प्रास्ताविकातून गांधी विचारांचा जागर करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्रा. ईश्वर दावणे, प्रा. पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते. प्रा. आशा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT