कोल्हापूर

उपसरपंचावर हल्ला

CD

तेगीनहाळच्या उपसरपंचांवर
शेती वादातून विळ्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : तेगीनहाळ (ता. गडहिंग्लज) येथे शेतीच्या वादातून विळा व दगडाने झालेल्या हल्ल्यात उपसरपंच मनोज जाधव व त्यांची आई रत्नाबाई जाधव हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मनोजचे चुलते आप्पाजी जाधव व मारुती जाधव या दोघांविरुद्ध पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मनोज व त्यांच्या चुलत्यांमध्ये शेतीचा वाद आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास मनोज हे आपल्या घराच्या दारात उभे होते. त्यावेळी आप्पाजी व मारुती जाधव हे दोघेही विळा घेऊन आले. मनोजला उद्देशून ‘तू उपसरपंच झाल्यापासून लई माजल्यासारखा वागत आहेस, तू गाव सोडून जा, नाहीतर शिमग्यापर्यंत तुला व आईला ठार मारतो’, असे म्हणून दोघांनीही विळा व दगडाने मनोज व आई रत्नाबाई यांच्या डोकीत व हातावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जखमी मनोज यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक शीतल सिसाळ अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT