कोल्हापूर

वैद्यकीय चाचणी करूनच मल्लांना ‘मॅट’वर सोडणार

CD

फोटो घेणे.........

आजच्या बातमीचे कात्रण

वैद्यकीय चाचणीनंतरच मल्ल ‘मॅट’वर
आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा निरीक्षकांकडून ‘सीरिंज’ची दखल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी सीरिंज सापडल्याच्या प्रकाराची आज स्पर्धा निरीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली. डोपिंगसारखे प्रकार टाळण्यासाठी आणि प्रामाणिक खेळाडूंना न्याय मिळण्यासाठी या स्पर्धेत वजन घेण्यापासून लढत होईपर्यंत मल्लांवर वैद्यकीय पथकाची नजर राहणार आहे. वैद्यकीय चाचणी करूनच मल्लांना ‘मॅट’वर सोडण्यात येईल, असे भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) स्पर्धा निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने आज ‘कुस्ती स्पर्धा परिसरात सापडल्या सीरिंज’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते.
स्पर्धेच्या परिसरामध्ये सीरिंज सापडल्याचे वास्तव आहे. स्पर्धेत उत्तेजक द्रव्यांचा वापर होणे चुकीचे आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी आम्ही काही कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात विविध गटांतील स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तसेच मल्लांचे वजन घेण्यापूर्वी आणि पुढे त्यांना मॅटवर सोडण्याआधी वैद्यकीय चाचणी केली जाईल. लढतीदरम्यान एखाद्या मल्लाच्या हालचालींमध्ये बदल जाणविल्यास त्याची त्वरित तपासणी करण्यात येईल. स्पर्धास्थळाच्या परिसरातील स्वच्छतागृहांबाहेर आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. त्याची अंमलबजावणी शुक्रवार (ता. २७) पासून सुरू होणाऱ्या ग्रीको रोमन गटातील स्पर्धांपासून केली जाईल, असे डॉ. मलिक यांनी सांगितले.

‘एआययू’ला अहवाल देणार
सीरिंज सापडलेल्या प्रकाराचा अहवाल ‘एआययू’ला पाठविणार आहे. यापुढे विविध ठिकाणी होणाऱ्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी नॅशनल डोपिंग टेस्टिंग एजन्सीचे (नाडा) पथक उपस्थित ठेवावे. त्याद्वारे स्पर्धेतील मल्लांची रँडम तपासणी करण्याची आग्रही मागणी ‘एआययू’कडे करणार असल्याचे डॉ. मलिक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT