कोल्हापूर

विशाळगड बैठक

CD

78643
...
विशाळगड संवर्धनाला
निधी कमी पडू देणार नाही

आमदार विनय कोरे ः शिवभक्तांच्या बैठकीत ग्वाही

कोल्हापूर, ता. २७ ः ‘छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि इतिहासात गौरवशाली स्थान असलेल्या किल्ले विशाळगडच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही’, अशी ग्वाही आमदार विनय कोरे यांनी दिली. विशाळगड संवर्धनासंदर्भात किल्ले पन्हाळगडावर झालेल्या शिवभक्तांच्या बैठकीत ते बोलत होते.
विशाळगडावरील अतिक्रमण, ऐतिहासिक स्थळांची झालेली दुरवस्था, गडावरील अस्वच्छता आणि गडाची संवर्धन या विषयावर तोडगा काढण्यासाठी विशाळगड संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संघटना आणि संस्थांच्या प्रमुख प्रतिनिधींबरोबर आमदार कोरे यांची बैठक झाली. पन्हाळा येथे झालेल्या बैठकीला इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे, संभाजी साळुंखे, दिलीप देसाई, किशोर घाटगे, राम यादव, अमित अडसूळ, बाळासाहेब भोपळे, मधुकर नाझरे, ॲड. राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गडावरील दुर्लक्षित असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांना पुन्हा उजेडात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. हर्षल सुर्वे यांनी गडावर छत्रपती शिवरायांचे भव्य शिल्प उभारण्याची मागणी केली.
आमदार कोरे यांनी गडाचे गडपण जपताना गडावरील कोणत्याही ऐतिहासिक स्थळांना धक्का न लावता त्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. शिवभक्तांकडून येणाऱ्या सूचना डोळ्यासमोर ठेवूनच विशाळगडचा विकास केला जाईल आणि भविष्यात गड अतिक्रमणमुक्त व प्रदूषणमुक्त कसा राहील, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT