कोल्हापूर

रत्नमाला घाळींचे निधन

CD

फोटो क्रमांक : gad305.jpg :
79339
श्रीमती रत्नमाला घाळी
-----------------------------------------

श्रीमती रत्नमाला घाळी
यांचे गडहिंग्लजला निधन
गडहिंग्लज, ता. 30 : येथील विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा व कोल्हापूर वीरशैव बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा श्रीमती रत्नमाला शिवलिंग घाळी (वय 92) यांचे आज (सोमवार) सायंकाळी चारच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
उद्या (मंगळवार) सकाळी 7 ते 11 पर्यंत आजरा रोडवरच्या गांधीनगरातील शिवयोगी बंगल्यात अंत्यदर्शन, त्यानंतर बंगल्यापासून बेलबागेपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. वडरगे रोडवरील बेलबागेमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. माजी आमदार कै. डॉ. एस. एस. घाळी यांच्या त्या पत्नी तर विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा सिंबायोसिसचे व्यवस्थापकीय सदस्य डॉ. सतीश घाळी यांच्या त्या काकी होत. डॉ. घाळी यांच्या निधनानंतर 1987 पासून विद्या प्रसारक मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर आली. आजअखेर त्यांनी या संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. या संस्थेसह गडहिंग्लजकरांच्या माऊली म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
गडहिंग्लज नगरपालिकेत 1962 ते 1977 पर्यंत त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. संजय गांधी निराधार योजना समिती, एस.टी. दक्षता समिती, विशेष कार्यकारी अधिकारी, मोफत कायदा सल्लागार समिती, गडहिंग्लज तालुका खरेदी-विक्री संघ आदी संस्थेत त्यांनी संचालक, अध्यक्ष व सदस्यपदावर काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदावरही त्या कार्यरत होत्या. गांधीनगर को-ऑप हौसिंग सोसायटीच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत. सहकार क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल त्यांचा गौरव झाला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, श्रीमती सुशिलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार व ऋग्वेद पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
--------------------------------------------------------------
श्री. अजित माद्याळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT