कोल्हापूर

अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला ठेंगा

CD

अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला ठेंगा
वस्त्रोद्योगातील जाणकारांतून प्रतिक्रिया; नवीन योजना, भरीव तरतूद नाही
इचलकरंजी, ता. १ ः केंद्र शासनाकडून आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला ठेंगा दाखवला आहे. कोणतीही नवीन योजना अथवा भरीव तरतूद केलेली नाही. याबाबतची माहिती वस्त्रोद्योगातील जाणकारांनी दिली. मुळात वस्त्रोद्योग अडचणीतून जात आहे, तर या सरकारचा शेवटचा अर्थंसकल्प असल्यामुळे वस्त्रोद्योगासाठी भरीव तरतुदीची आशा होती, मात्र ठळक बाबीमध्ये वस्त्रोद्योगाचा साधा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाच्यादृष्टीने हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
देशातील विविध राज्यांमध्ये वस्त्रोद्योग पसरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वस्त्रोद्योगाचे जाळे आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा हा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगाबाबत यापूर्वी शासनाकडून सतत मदतीची भूमिका घेतली होती, मात्र अलीकडे वस्त्रोद्योगातील यंत्रमागासह विविध घटक अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळेल, अशी आशा होती. कापूसऐवजी कापड निर्यातीला प्राधान्य देण्यासह टफ योजनेचा लाभ देण्यासाठी जाचक अट दूर करण्याची मागणी होती, मात्र याबाबत कोणतीच घोषणा झाली नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
----------
केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. नवीन योजना जाहीर केली जाईल, अशी आशा होती, पण तशी कोणतीही ठळक बाब अर्थसंकल्पात दिसून येत नाही.
-विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना
----------
वस्त्रोद्योगाला दिलासा देणारी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. उलट नवीन यंत्रसामग्रीवर ७.५० टक्के आयात शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. त्याचा फटका संबंधित उद्योजकांना बसणार आहे.
-चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

Nathsagar Dam : नाथसागराचे ड्रोनद्वारे चित्रिकरण पडले महागात; एका जणाविरुद्ध गुन्हा

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

SCROLL FOR NEXT