कोल्हापूर

अंतिम मतदार यादीनंतरही नाव समाविष्ट करता येणार

CD

अंतिम मतदार यादीनंतरही
नाव समाविष्ट करता येणार
---
निवडणूक आयोगाचे महापालिकांना आदेश
कोल्हापूर, ता. १ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली असल्यास वा मतदार यादीत समाविष्टच केली नसल्यास संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती समाविष्ट करता येणार आहेत. आवश्‍यक तपासणी करून पुरवणी यादीच्या स्वरूपात योग्य दुरुस्ती करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले आहेत. मात्र मूळ यादीत नसलेली नवीन नावे समाविष्ट वा वगळता येणार नाहीत, असेही सूचित केले आहे.
सर्व ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थांसाठी हा आदेश लागू केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेली विधानसभा निवडणुकीची मूळ मतदार यादी फोडताना मोघम पत्त्यांमुळे अनेक इमारती व नावे दुसऱ्या प्रभागात जातात. तसेच, संस्‍थेच्या क्षेत्राबाहेरील मतदारांची नावेही समाविष्ट होतात अशा तक्रारी केल्या जातात. त्या टाळण्यासाठी व काही सुधारणा करण्यासाठी हा आदेश काढला आहे. त्यात आयोगाने निश्‍चित केलेली त्या क्षेत्राची मूळ मतदार यादी प्रभागनिहाय फोडण्यासाठी वापरायची आहे. त्या मूळ यादीत कोणतीही नावे समाविष्ट वा वगळणे, सुधारणा करण्यास परवानगी नाही. हरकती व सूचना कालावधीत मूळ यादीत असलेली; पण कोणत्याही प्रभागात नसलेली नावे योग्य प्रभागात समाविष्ट करायची. इतर प्रभागात गेलेली नावे योग्य प्रभागात समाविष्ट करावीत. तसेच, इतर विधानसभा क्षेत्रातील सहभागी नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
-------------
चौकट
मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत इतर प्रभागात गेलेली नावे, प्रभागाच्या मतदार यादी समाविष्ट नसलेल्या नावांबाबत काहीही करता येत नव्हते. हरकती निकाली काढल्या जात होत्या. पण, आता नव्या आदेशाने संबंधित मतदाराने नाव समाविष्ट करण्याबाबत रीतसर अर्ज केला असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्याला तपासणी करून योग्य त्या दुरुस्त्या पुरवणी यादीच्या स्वरूपात कराव्या लागणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत कुणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची यातून दक्षता घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT