कोल्हापूर

अंतिम मतदार यादीनंतरही नाव समाविष्ट करता येणार

CD

अंतिम मतदार यादीनंतरही
नाव समाविष्ट करता येणार
---
निवडणूक आयोगाचे महापालिकांना आदेश
कोल्हापूर, ता. १ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली असल्यास वा मतदार यादीत समाविष्टच केली नसल्यास संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती समाविष्ट करता येणार आहेत. आवश्‍यक तपासणी करून पुरवणी यादीच्या स्वरूपात योग्य दुरुस्ती करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले आहेत. मात्र मूळ यादीत नसलेली नवीन नावे समाविष्ट वा वगळता येणार नाहीत, असेही सूचित केले आहे.
सर्व ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थांसाठी हा आदेश लागू केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेली विधानसभा निवडणुकीची मूळ मतदार यादी फोडताना मोघम पत्त्यांमुळे अनेक इमारती व नावे दुसऱ्या प्रभागात जातात. तसेच, संस्‍थेच्या क्षेत्राबाहेरील मतदारांची नावेही समाविष्ट होतात अशा तक्रारी केल्या जातात. त्या टाळण्यासाठी व काही सुधारणा करण्यासाठी हा आदेश काढला आहे. त्यात आयोगाने निश्‍चित केलेली त्या क्षेत्राची मूळ मतदार यादी प्रभागनिहाय फोडण्यासाठी वापरायची आहे. त्या मूळ यादीत कोणतीही नावे समाविष्ट वा वगळणे, सुधारणा करण्यास परवानगी नाही. हरकती व सूचना कालावधीत मूळ यादीत असलेली; पण कोणत्याही प्रभागात नसलेली नावे योग्य प्रभागात समाविष्ट करायची. इतर प्रभागात गेलेली नावे योग्य प्रभागात समाविष्ट करावीत. तसेच, इतर विधानसभा क्षेत्रातील सहभागी नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत इतर प्रभागात गेलेली नावे, प्रभागाच्या मतदार यादी समाविष्ट नसलेल्या नावांबाबत काहीही करता येत नव्हते. हरकती निकाली काढल्या जात होत्या. पण, आता नव्या आदेशाने संबंधित मतदाराने नाव समाविष्ट करण्याबाबत रीतसर अर्ज केला असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्याला तपासणी करून योग्य त्या दुरुस्त्या पुरवणी यादीच्या स्वरूपात कराव्या लागणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत कुणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची यातून दक्षता घेतली आहे.
----------
चौकट
निवडणुकीच्या तयारीचे पडघम
पुढील आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने हा आदेश काढला गेला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT