कोल्हापूर

ब्राम्हण सभा

CD

स्त्री निरोगी असेल तर
कुटुंबही निरोगी राहू शकते

डॉ. चौधरी : महिलांसाठी आरोग्य शिबिर

कोल्हापूर, ता. ४ : ‘‘एक स्त्री निरोगी असेल तर तिचे कुटुंबही निरोगी राहू शकते. त्यासाठी स्त्रीयांनी आरोग्याबाबत सजग राहावे. कोणत्याही आजाराची लक्षणे दिसतात. कर्करोगासारखे आजारही प्राथमिक अवस्थेत असल्यास अधुनिक उपचार तंत्राद्वारे बरे होतात. गंभीर आजारही कायमस्वरूपी बरा होऊन तंदुरुस्त जीवन जगता येते.’’ असे मत डॉ. यशस्वी चौधरी यांनी व्यक्त केले.
करवीर ब्राह्मण सभा मंगलधाम व चित्त पावन संघ, ॲपल कॅन्सर इऩ्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
ॲपलच्या कार्यकारी संचालिका गीता आवटे म्हणाल्या की, ‘‘महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहावे, कोणत्याही आरोग्यविषयक शंका समस्यांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून निरसन करून घ्यावे.’’ डॉ. नाकिया मुल्ला यांनी महिलांच्या गर्भाशयाचे आजार, सर्व्हायकल कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर लक्षणे व उपचाराबाबतची माहिती दिली. तसेच महिलांनी आजारांविषयी संकोच न करता तपासणी व उपचार घ्यावेत.
शंभरावर महिलांची आरोग्य तपासणी झाली. नंदकुमार मराठे, संगीता आपटे, सीमा गोखले. श्रीकांत लिमये, प्रसाद भिडे, केदार जोशी, संतोष साने आदीनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT