‘विहिंप’, बजरंग दलातर्फे
विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर, ता. ७ : ज्याप्रमाणे विशाळगडाची अवस्था झाली, त्याप्रमाणे पावनगडाची अवस्था होऊ नये, म्हणून या वर्षीपासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे पावनगड (ता. पन्हाळा) येथे महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री साजरी करणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जिल्हा मंत्री ॲड. सुधीर जोशी-वंदुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१७ ला रात्री नऊ ते बारा दरम्यान भजन आणि जागर होईल. १८ ला सकाळी सहा वाजता अभिषेक, सकाळी नऊ ते दहा दुर्ग सेवक, गोरक्षकांचा सत्कार होईल. सकाळी दहा ते अकरा दरम्यान जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज श्री. मोरे महाराज (देहू आळंदी) यांचे व्याख्यान होईल. सकाळी साडेअकारा वाजता महाआरती व महाप्रसाद वाटप होईल. पावनगडाची पावित्र्य टिकवण्यासाठी या महाशिवरात्रीला दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींनी यावे, असे आवाहन केले.
अध्यक्ष कुंदन पाटील, बजरंग दल शहर संयोजक पराग फडणीस, सहसंयोजक अक्षय ओतारी, विश्व हिंदू परिषदचे उपाध्यक्ष शांतीबाई लिंबांनी, शहर मंत्री उत्तम सांडुगडे, राजेंद्र मकोटे, तुषार भिवटे, दुर्गा वाहिनी संयोजिका ॲड. सुप्रिया दळवी, आरोग्य विभाग प्रमुख अश्विनी माळकर आदी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.