कोल्हापूर

गांधींच्या जीवनावर व्याख्यान

CD

गांधींच्या जीवनावर व्याख्यान
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. प्रा. आप्पासाहेब कमलाकर यांनी मोहनदास ते महात्मा गांधी, या विषयावर गांधींच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. माजी प्राचार्य कल्याणराव पुजारी, प्रा. कमलाकर, ईश्‍वर दावणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे अध्यक्षस्थानी होते. कल्याणराव पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यु. पी. सावंत यांनी स्वागत केले. वैशाली रेपाळ यांनी आभार मानले.
---------------------------------------------------------
सुमंगलम् लोकोत्सवासाठी साहित्य रवाना
गडहिंग्लज : कणेरी मठावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सोहळ्यासाठी पार्वती हायस्कूलमधून तांदूळ, गहू, ज्वारी, हरभरा डाळ, साड्या, प्लास्टिक, मुलामुलींचे ड्रेस, शर्ट-पॅन्ट आदी साहित्य विद्यार्थी व शिक्षकांकडून जमा करून पाठवले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, उमेश सावंत, बी. जी. कुंभार, जी. आर. पाटील, व्ही. आर. रेपाळ, ए. बी. पन्नोरी, ए. डी. पोवार आदींनी परिश्रम घेतले.
--------------------------------------------------------------
नूलला बारावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा
नूल : येथील न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल व ज्युनिअर कॉलेजमधील बारावी आर्टस, कॉमर्स व सायन्सच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम झाला. प्राचार्य जयवंत वडर अध्यक्षस्थानी होते. नीळकंठ कुराडे यांनी स्वागत केले. मनीषा देसाई, आरती चौगुले, अनुराधा बिद्रे, महेक सनदी, श्रावणी चव्हाण, अपूर्वा गावडे, पूर्वा पाटील, स्वरावली मगदूम, साक्षी पाटील, शंकरगोंडा पाटील, अनुप दिवटी, अभिजित देवार्डे, अफसाना गवंडी, युवराज गायकवाड, डॉ. सीमा साखरे, पांडुरंग नांदवडेकर, पर्यवेक्षक अरुण हिरेमठ, संस्थेचे संचालक विलासराव कुलकर्णी यांची भाषणे झाली. नेत्रा चव्हाण व कविता रवंदी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT