कोल्हापूर

यंदा प्रथमच तालुकास्तरावर भरारी पथक

CD

यंदा प्रथमच तालुकास्तरावर भरारी पथक
बारावी परीक्षा आजपासून : कॉपीमुक्त अभियानांतर्गत बैठी व झडती पथके
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर भरारी पथकाची नजर राहणार आहे. कॉपीमुक्त अभियान अंतर्गत यंदा प्रथमच तालुकास्तरावर हे पथक तयार केले आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर १२ बैठी व १२ झडती पथके तैनात ठेवली जाणार आहेत. दरम्यान, उद्यापासून (ता. २१) बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे.
दहावी व बारावी परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. गडहिंग्लज तालुक्यात बारावीसाठी सहा केंद्र आहेत. शहरातील रावसाहेब कित्तूरकर महाविद्यालय, संभाजीराव माने महाविद्यालय, गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय, एम. आर. महाविद्यालय, साधना कनिष्ठ महाविद्यालयासह नेसरी येथील एस. एस. हायस्कूलवर परीक्षा केंद्र आहेत. येथे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे.
कॉपीमुक्तीसाठी तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक व गटशिक्षणाधिकाऱ्यांची समिती तयार केली आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली यंदा प्रथमच भरारी पथक निर्माण केले आहे. ते केंद्रांना अचानक भेट देईल. विद्यार्थ्यांजवळ कॉपीचे साहित्य आढळल्यास त्याच्या उत्तरपत्रिकेवर कॉपिंग केस लिहिले जाईल. बैठ्या पथकांकडून विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासण्यासह केंद्राच्या आवारात अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. झडती पथकाकडून परीक्षा केंद्रावर प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांची झडती घेतली जाईल. एका बैठ्या पथकात सहा तर झडती पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
----------------
मोबाईल लोकेशन ऑन
येथील एम. आर. हायस्कूलमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवल्या आहेत. प्रश्नपत्रिका प्रत्येक पेपरदिवशी सकाळी केंद्रावर पोहोच केल्या जातात. प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या आणि पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल लोकेशन ऑन ठेवावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT