कोल्हापूर

राज्य उत्पादन कारवाई

CD

84211
...


मद्य तस्करीप्रकरणी सिंधुदुर्गातील एकास अटक

साडेदहा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त ः राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २० ः महाराष्ट्रात बंदी असलेले गोवा बनावटीचे मद्य पन्हाळ्यात पोचविण्यासाठी जात असताना काल रात्री कागलजवळ कारवाई झाली. यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्गातील एकास अटक करण्यात आली. गोपाळ सुरेश गावडे ‌(वय ३४, रा. चौकुळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचा मद्यसाठा आणि सात लाखांचे वाहन जप्त केले. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली. भरारी पथकाने काल रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी आणि अवैध वाहतूक होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांकडून काल संशयित वाहनांची तपासणी केली जात होती. पुणे-बंगळूर महामार्गावर कागल येथे एक पांढऱ्या रंगाची मोटार थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये पथकाला गोवा बनावटीचे साडेतीन लाख रुपये किमतीचे ६८ बॉक्स मिळाले. पथकाने मद्यसाठा आणि वाहन असा सुमारे १० लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा साठा पन्हाळ्यातील एका व्यक्तीकडे पोहोचविला जाणार होता, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितली. संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, जवान सचिन काळेल, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिनगारे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT