कोल्हापूर

लक्ष्मीनारायण प्रतिष्ठापना सोहळा

CD

84561
कोल्हापूर : व्‍हिनस कॉर्नर येथील लक्ष्मीनारायण मंदिरात बुधवारी श्री महागणपती आणि गोपूरपंचकलशाची प्रतिष्ठापना झाली.

श्री लक्ष्मीनारायण मंदिरात
महागणपती, पंचकलश प्रतिष्ठापना
भाविकांच्या उपस्थितीत भव्य नगरप्रदक्षिणा सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : व्‍हिनस कॉर्नर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आज महागणपती मूर्ती आणि गोपूरपंचकलशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. तत्पूर्वी भाविकांच्या अपूर्व उत्साहात लक्ष्मीपुरी परिसरातून भव्य नगरप्रदक्षिणा झाली. दरम्यान, दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. प्रतिष्ठापना विधीनंतर झालेल्या महाप्रसादाचा लाभही भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला.
महागणपती आणि गोपूरपंचकलश प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त कालपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. मूर्तीस जलाधिवास, धान्याधिवास, पुष्‍प, फल, वस्त्र अधिवास आदी विधी झाल्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम रंगला. आज सकाळी साडेनऊला लक्ष्मीपुरी परिसरातून भव्य नगरप्रदक्षिणा झाली. त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा या वेळेत प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर महाप्रसादाचे वितरण झाले. रुईकर कॉलनीतील चित्रकार विक्रमसिंह पाटील यांनी महागणपतीची मूर्ती ट्रस्टला सुपूर्द केली आहे. पाटील परिवारातर्फे दिनकरराव पाटील, विक्रमसिंह पाटील, नारायणी पाटील आदी उपस्थित होते. गोपूर पंचकलशाचे मुख्य यजमान हरिष जैन होते.
दरम्यान, श्री लक्ष्मीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोयनका, सचिव दिलीप बजाज, सुभाष मालू, पुरुषोत्तम झंवर, अशोक अग्रवाल, प्रदीप तेडिया, परेश अग्रवाल आदींनी नेटके संयोजन केले. पुरुष भाविकांसाठी कुर्ता-पायजमा आणि महिलांसाठी लाल रंगाची साडी असा पेहराव असल्याने या सोहळ्याची उंची आणखीनच वाढली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT