कोल्हापूर

गर्भलिंग निदान - राधानगरी कारवाई

CD

फोटो-84880
-
लोगो- गर्भलिंग निदान प्रकरण

बनावट डॉक्टर, एजंटाला अटक
राधानगरी पोलिसांचे यश; १२ वी पास कंपाउंडर झाला डॉक्टर, पन्हाळ्यात दोन दवाखाने सुरूच

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : राधानगरी तालुक्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या बनावट डॉक्टरसह एजंटाला राधानगरी पोलिसांनी रात्री अटक केली. एजंट संजय आप्पासो गोंधळी (रा. सुळकूड, ता. कागल) आणि बनावट डॉक्टर विठ्ठल हिंदूराव निकम (३९, रा. सावर्डे, दुमाला, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी आज दिली.
पोलिसांनी सांगितले, की एजंट असलेला गोंधळी याने मिरज, कागल तालुक्यातील महिला रुग्णांना गर्भलिंग चाचणी करीता संशयित आरोपी श्रीमंत पाटील यांच्याकडे पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने यासाठी किती रुपये घेतले यांसह अन्य माहिती पुढील तपासात मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी किती गर्भपात केले याचीही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बनावट डॉक्टर विठ्ठल निकम याचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. २००८ पूर्वी तो आर्थोपेडिक रुग्णालयात कंपाउंडर म्हणून नोकरीस होता. त्यानंतर त्याने स्वतःचे दोन दवाखाने पन्हाळा तालुक्यात उघडले आहेत. तेथे तो आजही उपचार करीत आहे. तसेच त्याने संशयित आरोपी राजेंद्र यादव याच्याकडून महिलांची गर्भलिंग चाचणी केली आहे. मुलगी असल्यास त्या संबंधित महिलांच्या घरी जावून त्यांचा गर्भपात घडवून आणल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अधिक तपासात त्याच्याकडून आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.
पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, हेड कॉन्स्टेबल के. डी. लोकरे, बी. डी. पाटील, सुरेश मेटिल, सचीन पारखे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन गुरव, रोहित खाडे आदींनी तपास केला.
जिल्हामध्ये गर्भलिंग चाचणी करणारे रॅकेट तयार झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली होती. या गुन्ह्यात १८ आरोपी निष्पन्न झालेले असून, त्यातील १२ आरोपी अटक केले आहेत. संशयित गजेंद्र उर्फ सनि बापुसो कुसाळे (रा. शिरसे ता. राधानगरी), ओंकार कराळे (रा. सडोली, ता. करवीर), राजेंद्र यादव (रा. कारभारवाडी, ता. करवीर) आणि डॉ. प्रसाद देंगे (रा. मडिलगे बुद्रुक ता. भुदरगड) हे अद्याप फरारी असल्याचे निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT