कोल्हापूर

सक्षम बना, देशाचे नाव मोठे करा

CD

85121)
........

सक्षम बना, देशाचे नाव मोठे करा
शाहिदा परवीन गांगुली; विद्यार्थिनींशी साधला संवाद

कोल्हापूर, ता. २४ ः ‘शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या महिला, मुलींनी मजबूत होणे गरजेचे आहे. त्यासह आपल्यातील आंतरिक शक्ती जागृत करणे आवश्यक आहे. जीवन हे एकदाच मिळते. त्यामुळे चांगले जगून सक्षम बनून आपल्या देशाचे नाव मोठे कर’, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या सहाय्यक पोलिस आयुक्त शाहिदा परवीन गांगुली यांनी आज येथे केले.
येथील डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे हॉटेल सयाजीमध्ये आयोजित ‘स्त्रीशक्ती’ या विषयावर त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. शाहिदा परवीन गांगुली म्हणाल्या, ‘जीवनामध्ये संकटे येतात. मात्र, त्यावर मात करून यशस्वी होण्याची आवश्यकता आहे. आपली शक्ती ओळखून मनातील भीती नाहीशी करा. कुटुंबाचा विश्वास संपादन करा. कोणत्याही वाईट सवयी शरीराला लावून न घेता आयुष्य जगा. चांगल्या संस्कारासाठी आई-वडिलांशी सुसंवाद साधा.’
या कार्यक्रमात डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते शाहिदा आणि त्यांचे पती ब्रिगेडियर गौतम गांगुली यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते. पूजा पाटील यांनी प्रास्ताविक केले. वृषाली पाटील यांनी आभार मानले. श्रीलेखा साटम यांनी सूत्रसंचालन केले.
...
चौकट
एन्काऊंटरची माहिती देत संवाद

जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्यांशी झालेल्या झटापटीसह शाहिदा परवीन गांगुली यांनी केलेल्या एन्काऊंटरची माहिती विद्यार्थिनींना दिली. त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांनी संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT