कोल्हापूर

स्पर्श आर्थोपेडिक सेंटरचे उदघाटन

CD

85158
कोल्हापूर : स्पर्श आर्थोपेडिक केअर सेंटरचे उद्‍घाटन करताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज. सोबत इतर मान्यवर.


‘स्पर्श आर्थोपेडिक’चे उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. २५ : अपघात आणि हाडांचे आजार यामध्ये रुग्णसेवा देण्यासाठी स्पर्श ‘ऑर्थोपेडिक सेंटर अँड जॉईंट केअर’ हे कोल्हापुरात यशस्वी ठरेल, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी ‘स्पर्श’च्या उद्‍घाटनप्रसंगी व्यक्त केले. अस्थीरोगातील सर्वच चिकित्सांवर प्रभावी आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नॉर्थ स्टार हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक जोशी व डॉ. सचिन फिरके एकत्र येऊन रुग्णसेवा देत आहेत. सासने मैदान, ताराबाई पार्क येथे या सेंटरचे उद्‍घाटन झाले.
कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियांमध्ये निपुण डॉ. सचिन फिरके यांनी इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स येथून सांधेरोपण विषयातील फेलोशिप घेतलेली आहे. तसेच डॉ. दीपक जोशी यांनी एम. सी. एच. (जॉईंट रिप्लेसमेंन्ट) ही पदवी इंग्लंड मधून प्राप्त केली आहे. त्यांनी सांधेरोपणाबरोबरच स्पोटर्स मेडिसिन ही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची ‘डिप्लोमा इन स्पोर्टस् मेडीसिन’ ही पदवी मिळवली आहे.
बस स्थानकनजीक असणाऱ्या स्पर्श क्लिनिकमध्ये अद्ययावत कन्सल्टिंग रूम, फिजिओथेरपी, फार्मसी, डिजिटल एक्स रे, अॅम्ब्युलन्स ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच अद्ययावत वैद्यकीय सेवा माफक दरात देण्यास स्पर्श क्लिनिक व नॉर्थ स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कटिबद्ध असेल, याची ग्वाही उद्‍घाटनप्रसंगी डॉ. सचिन फिरके व डॉ. दीपक जोशी यांनी दिली.ी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT