कोल्हापूर

स्वतंत्र जिम

CD

86229

महापालिकेची महिलांसाठी स्वतंत्र जिम
सानेगुरुजी वसाहतीत २५०० चौरस फुटांवर बांधकाम

कोल्हापूर, ता. १ ः महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र जिम उभी केली जात आहे. सानेगुरुजी वसाहतीतील सूर्यवंशी कॉलनीत २५०० चौरस फुटांवर बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी ३५ लाख खर्च करण्यात येत आहेत.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या पाहणीदरम्यान निधीअभावी दरवाजे, खिडक्या, फरशी, टॉयलेटची कामे अपुरी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या निधीमधून उर्वरित कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या होत्या. त्यानुसार १२ लाख ३२ हजारांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. शासनाच्या जिल्हा क्रीडा विभागामार्फत ७ लाखांचे जिमचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. साहित्य मिळेपर्यंत विद्युतीकरणाची तसेच रंग, इतर अनुषंगिक कामे करून घेण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT