कोल्हापूर

स्वच्छतागृह बैठक

CD

महिलांसाठी हायजेनिक स्वच्छतागृहांचे
डिझाईन व बजेट प्रस्तावित : आडसूळ

कोल्हापूर, ता. ३ : महिलांसाठी हायजेनिक स्वच्छतागृहांचे डिझाईन व बजेट प्रस्तावित केले आहे. त्याबाबतची मान्यता घेण्यात येणार असून, त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रियेस सुरुवात केली जाणार असल्याचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले. त्यामुळे विविध संघटनांनी आठ मार्च रोजी जाहीर केलेले आत्मक्लेष आंदोलन स्थगित केले आहे.
हायजेनिक महिला स्वच्छतागृहासाठी छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन जाहीर केले होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रविकांत अडसूळ, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अभियंता अनुराधा वांडरे यांनी स्वच्छतागृहांचे डिझाईन व बजेट प्रस्तावित केल्याचे सांगितले. उपायुक्त आडसूळ म्हणाले, ‘‘२०२३-२४ या वर्षांमध्ये या कामासाठी प्रस्ताव तयार करून मान्यतेची प्रक्रिया केली जाणार आहे. स्वच्छतागृहांमध्ये महिलांना व्हेंडिंग मशीन, चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष व इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.’’ ती पे अँड यूज धर्तीवर सुरू करावीत. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंतच त्यांची वेळ ठेवून नंतर बंद करावीत, अशा मागणी संघटनांनी मांडल्या. उपायुक्त आडसूळ यांनी प्रस्ताव मंजूर होताच स्वच्छतागृहांबाबत माहिती प्रसिद्ध केली जाईल, असे सांगितले. महिलांची होणारा त्रास थांबवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आंदोलनाचा पवित्रा ठेवला असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT