कोल्हापूर

डीकेटीईच्या स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीचे दर्शन

CD

ich31.jpg
86665
इचलकरंजी ः डीकेटीईच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दाक्षिणात्य पारंपरिक वेशभूषा सादर केली.
--------
डीकेटीईच्या स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीचे दर्शन

इचलकरंजी, ता. ३ ः येथील डीकेटीई संस्थेच्या स्नेहसंमेलनातून यंदाही विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवले.
दोन दिवस डान्स शो, व्हरायटी शो, रक्तदान, जिनीअस, फोटोग्राफी, फिशपॉंड अशा भव्य कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. आज पहिल्या दिवशी ‘भरारी’ स्नेहसंमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व ढोलपथकाने मानवंदना देऊन केली.
‘ट्रॅडिशनल डे’ हा वेगवेगळ्या कलाकृतीतून झाला. छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या कलाकृती असलेले शिल्प राजवाड्यामध्ये मिरवणुकीने आणले. छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, तुकाराम महाराज, साधू, संत, सैनिक व काही मुलांनी मर्दानी खेळ आदी विविध वेषभूषांचे विद्यार्थ्यांमार्फत सादरीकरण केले. दरवर्षी विविध विषयांतून विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवतात. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे परदेशी मुलेही महराष्ट्रीय पोषाख परिधान करून आली होती.
संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे व ट्रस्टींचे मार्गदर्शन लाभत आहे. उद्‍घाटन डायरेक्टर प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यू. जे. पाटील यांच्या हस्ते केले. सोशल विभाग प्रमुख प्रा. ए. व्ही. शहा, प्रा. ए. आर. बलवान, प्रा. ए. यू. अवसरे, सोशल डीन प्रा. एस. जी. कानिटकर, सुमोध दानोळे, मेधावी पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, आमदार आवाडे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सुमारे १०० विद्यार्थी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT