कोल्हापूर

आजरा ः वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

CD

फोटो
...


विजेच्या धक्क्याने
आजऱ्यात शेतकऱ्याचा मृत्यू

आजरा, ता. ३ ः येथे विजेचा धक्का बसून प्रकाश सदाशिव शिवगंड (वय ५५, रा. चाफेगल्ली) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ‘वडाचा गोंड’ नावाच्या शेतातील विजेची मोटार बंद करताना पावणेपाचच्या सुमाराला ही घटना घडली. त्यांची मुलगी पल्लवी प्रकाश शिवगंड हिने आजरा पोलिसांत वर्दी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, श्री. शिवगंड हे उसाला पाणी पाजवण्यासाठी गेले होते. पाणी पाजताना मोटरपंपाजवळ मोठा आवाज झाला. त्यावेळी शेतातील लोकांनी ओरडून मोटार बंद करा, अशी हाक दिली. शिवंगड हे मोटारीच्या दिशेने धावत गेले. मात्र, पाण्याची मोटार बंद करताना विजेचा धक्का लागून ते जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. तेथून त्यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार अशोक शेळके अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT