कोल्हापूर

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

CD

महागाई, वीज दरवाढविरुद्ध
आज गडहिंग्लजला मोर्चा
गडहिंग्लज : वाढती महागाई आणि वीज दरवाढ विरुद्ध जनता दलातर्फे उद्या (ता. ८) मोर्चा काढण्यात येणार आहे. जनता दलाचे नेते माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा लक्ष्मी मंदिरापासून सकाळी अकरा वाजता निघणार आहे. ३७ टक्के वीज दरवाढ ही सामान्य नागरिकांवर अन्यायी आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ५०, तर कमर्शियल गॅस सिलेंडर ३५० रुपयांनी वाढला आहे. शेती उपयोगी खते, बियाणे, तन नाशकांची किमत वाढल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाला ठोस कृती करण्याची गरज आहे. या प्रश्‍नासाठी हा मोर्चा असून शेतकरी, महिला व व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, स्वाती कोरी, काशिनाथ देवगोंडा, उदय कदम यांनी केले आहे.
-------------------
87315
मुगळी : विविध विकासकामांचा प्रारंभ करताना रमेश रिंगणे. शेजारी सोमगोंडा आरबोळे, मल्लिकार्जुन आरबोळे, संतोष भोसले, चंद्रकांत माने आदी उपस्थित होते.

मुगळीत रस्ता काँक्रीटीकरणाचा प्रारंभ
नूल : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतमार्फत ग्रामनिधी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंत मंदिर पाठीमागे, सिद्धनाथ लोखंडे ते शिंदेवाडी घर, भीमराव सांबरे ते तुकाराम शिवारे घर, अण्णासो चौगुले घरापासून प्रकाश चौगुले घरापर्यंत गटर्स बांधकाम व अण्णाप्पा घोटणे घर ते भास्कर हेरेकर घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण अशा सहा लाख २९ हजार रुपयांच्या कामांना प्रारंभ झाला. हिरा शुगर कारखान्याचे संचालक सोंमगोंडा आरबोळे, रमेश रिंगणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या वेळी सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे, संतोष भोसले, चंद्रकांत माने, वर्षा घोटणे, शोभा भोसले, संपदा पाटील, महानंदा कटकोळे, पी. आर. महाडिक, सुरेश चव्हाण, दूंडापा पाटील, वसंत घोटणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT