कोल्हापूर

महिला दिन एकत्रित

CD

‘स्त्री’शक्तीचा जागर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शहरात विविध सामाजिक संस्थातर्फे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला. जनजागृतीपर फेरी, व्याख्याने, आरोग्यविषयक शिबिरे तसेच महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांची रेलचेल राहिली. यानिमित्ताने महिलांचा हा दिवस अविस्मरणीय बनला. कष्टकरी महिला, विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून सामाजिक संस्था, संघटनांनी ‘स्त्री’ शक्तीचा गौरव केला.

04474
कोल्हापूर ः रुईकर कॉलनी मैदानावर गार्डन्स क्लबच्या वसंतोत्सवचे उद्‍घाटनप्रसंगी शकुंतला कदम , अध्यक्ष कल्पना सावंत, पल्लवी कुलकर्णी, शशिकांत कदम यांचेसह हिंद सोसायटीचे संचालक उपस्थित होते.

गार्डन्स क्लबतर्फे वसंतोत्सवाला प्रारंभ
कोल्हापूर ः घरकाम सांभाळून आपल्या आवडी -निवडी जोपासत विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन महिलांनी भरारी घ्यावी, असे आवाहन शकुंतला कदम यांनी केले. त्या कोल्हापूर येथील गार्डन्स क्लबच्या वतीने रुईकर कॉलनी मैदानावर ८ मार्च महिला दिन व वसंतोत्सव कार्यक्रमात बोलत होत्या. गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, सचिव पल्लवी कुलकर्णी, संगीता सावर्डेकर, शैला निकम, शशिकांत कदम, राज अथणे, ऑलओगच्या मयंका पाटील, तेजल सांवत, वैष्णवी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. वसंतोत्सवात कोल्हापूर, बेळगाव, जयसिंगपूर, इचलकरंजीसह इतर ठिकाणाहून महिला व विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला होता.
-
अवनि
वाकरे, खुपिरे, दोनवडे, सरनोबतवाडी व जाधववाडी येथील वीटभट्टी वरील श्रमिक महिलांसोबत महिला दिन साजरा केला. विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ घेतले. यामध्ये ६५ महिलांनी सहभाग दर्शविला. जयश्री कांबळे, साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवी कुऱ्हाडे व वीटभट्टीवरील शिक्षिका उपस्थित होत्या.
--------------------
शाहू दयानंद हायस्कूल
कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्था संचालित शाहू दयानंद मराठी शाळा व आर्य समाज बालमंदिरतर्फे मुख्याध्यापिका एस. आर. कलिकते यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सचिव ॲड. अनिरुद्ध पाटील कौलवकर यांनी शुभेच्छा दिल्या.
-------
शाश्वत प्रतिष्ठान
वैद्यकीय क्षेत्रातील योगदान आणि बॅंकेच्या माध्यमातून सहकारातील योगदानाबद्दल डॉ. माधुरी कुलकर्णी यांचा महालक्ष्मी बॅंकेच्या संचालिका मेघा जोशी यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, खजानिस अविनाश टकळे, संचालक अजय पाटील, निखिल जाधव, उमेश सांगावकर, डॉ. राजीव कुलकर्णी, प्रमोद जोशी उपस्थित होते.
-----
साई इंग्लिश मीडियम स्कूल
आरती फाउंडेशन व साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री पुरुष समानता हक्क आणि कर्तव्ये या विषयावर स्मिता पेटकर व डॉ. सीमा केसरकर यांचे महिलांचे आरोग्य व त्यांचे प्रश्न याविषयावर व्याख्यान झाले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. बी. एम. पाटील, संचालिका पूजादेवी पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच विजय शिंदे, डॉ. नीलेश केसरकर आदी उपस्थित होते.
-----

बीएसएनएल कोल्हापूर
दिलासा सामाजिक संस्थेच्या संस्थापिका डॉ. रूपा शहा, सहायक पोलिस निरीक्षक मेघा पाटील, आयुर्वेद चिकित्सक डॉ. अश्विनी जाधव यांनी मार्गदर्शन केले. महाप्रंबधक अरविंद पाटील, उपमहाप्रबंधक अनघा भोसले यांनी महिलांना स्वतःकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. उपमहाप्रबंधक स्नेहा विचारे यांनी मनोगत व्यक्त केले. मंडल अभियंता मीना कागीनकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार उपमंडल अभियंता प्रिया महाजन यांनी मानले.
-
तवनाप्पा पाटणे हायस्कूल
सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक बांधवांनी केले. मुख्याध्यापिका सौ. व्ही. एल. डेळेकर, पर्यवेक्षक आर. एस. मांडरे, जिमखाना प्रमुख यू. आर. देशपांडे, उपजिमखाना प्रमुख एस. बी. गोंधळी यांच्या हस्ते पुष्प, भेटवस्तू देऊन विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मातांचा सत्कार झाला. प्रशालेच्या शिक्षिकांचाही भेट वस्तू देऊन विशेष सत्कार करण्याचे नियोजन श्री. गोंधळी यांनी केले. शिक्षक, कर्मचारी, सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. श्री. गोंधळी यांनी आभार मानले. सौ. एस. व्ही. हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.
...
मास्टर दिनानाथ विद्यामंदिर
शाळेतील माता, पालकांना फेटे नेसवून सत्कार केला. शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा गायत्री निगवेकर, पूर्वी रेवाळे, नम्रता देवमाने, समीना मेस्त्री, मिसबा बागवान, वैशाली पाटील, कोमल वायदंडे, दिव्या गवळी, संगीता पाटील, ऐश्वर्या बन्ने या माता पालकांचा सत्कार केला. मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी उपक्रमाचे नियोजन केले. नारायण येटाळे, सुरेश चौगले यांचे सहकार्य लाभले.
...
श्रीदत्ताबाळ मिशन डिव्हाईन
श्रीदत्ताबाळ हायस्कूल, श्रीदत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर, श्रीदत्ताबाळ शिशुविहार, कॉसमॉस प्ले स्कूलतर्फे कार्यक्रम झाला. दीपाली तेलवेकर यांनी महिला दिनाचे महत्त्‍व सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, आकांक्षा देसाई, श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका कीर्ती मिठारी, वनिता जाधव, शिशुविहारच्या मुख्याध्यापिका प्रणिता वणकुद्रे उपस्थित होते. प्रगती कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. सविता पाटील यांनी आभार मानले.
...
नूतन मराठी विद्यालय हायस्कूल
मुख्याध्यापक डी. ए. शिंदे, जिमखाना प्रमुख आर. एन्. कुंभार, समारंभ प्रमुख ए. डी. पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. श्री. पाटील यांनी स्वागत केले. उदिता क्षीरसागर (नववी- अ), सुहानी साळोखे (सातवी), श्रुती पाटील (सहावी), पूर्वा पाटील (पाचवी), इंद्रायणी मराठे (सहावी) यांनी मनोगत व्यक्त केले. एस. एन. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. एस. एल. हावळ यांनी सूत्रसंचालन केले. ए. यु. दिक्षीत यांनी आभार मानले.
...
लोकमान्य विद्यालय प्रतिभानगर
लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचित जितेंद्र पाटील यांच्या हस्ते महिला शिक्षकांना गौरवले. मुख्याध्यापक अशोक पाटील उपस्थित होते. शीतल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. अर्चना कदम यांनी सूत्रसंचालन केले. महादेवी माळी यांनी आभार मानले.
...
इंदुमतीदेवी हायस्कूल
प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्स प्रशालेत मुख्याध्यापिका शैलजा भोसले, पर्यवेक्षक वर्षा पाटील, ज्येष्ठ शिक्षिका साधना पोवार, उमा भोसले, संगीता पोवार, जिमखाना प्रमुख सीमा सूर्यवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन झाले. सूर्यवंशी, पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिज्ञा कुंभार, प्रणिता बटकर यांनी सूत्रसंचालन केले. रिया लाड यांनी आभार मानले. संगीता पोवार, पल्लवी जाधव, माधुरी पाटील यांनी नियोजन केले. संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले.
...
यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिर कसबा बावडा
विविध कार्यक्रम घेतले. यामध्ये मुलींच्या नृत्य स्पर्धा, माता-पालकांच्या संगीत आणि पाककला स्पर्धा झाल्या. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या श्रीलेखा साटम अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड होत्या. मधुरा नरके यांनी पाककलेचे परीक्षणही केले. प्रथम माता-पालकांच्या स्पॉट गेम घेतल्या. मुख्याध्यापिका छाया हिरूगडे यांनी स्वागत केले. कोरोना योद्धा प्रिया पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. विद्या पाटील यांनी सूत्रसंचलन केले. राजाराम कांबळे, सुखदेव सुतार, साधना कुंभार, रूपाली पाटील, सरिता नारे, कल्पना माळी, विशाखा घस्ते, सर्व शिक्षक, सारिका पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
...
शाहू कॉलेज
‘महिला आणि पर्यावरण’ यावर दीपाली तायवडे (पाटील) यांचे व्याख्यान झाले. कला आणि वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सिंधू आवळे यांनी मार्गदर्शन केले.’’ महिला सचेतना समितीच्या प्रमुख प्रा. सायरा मुलानी यांनी प्रास्ताविक केले. सविता माजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तेजस्विनी कुरणे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांचे मार्गदर्शन केले.
...
87719
केएमटीत सत्कार
केएमटी प्रधान कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा लक्ष्मीपुरी ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अनघा फाळके यांच्या हस्ते भेट देऊन सत्कार झाला. यावेळी न्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, अनिल कदम, सुनील जाधव, सचिन गवळी, राजू वडर, संजू पाटील, मानसिंग जाधव, मारुती कलकुटगी उपस्थित होते.
...
महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय
बी. एड. प्रशिक्षणार्थींनी सावित्रीबाई फुले, सुधा मूर्ती, राणी लक्ष्मीबाई, सोनिया गांधी, कल्पना चावला, पी.टी. उषा, आशा भोसले, डॉ. निवेदिता माने अशा विविध वेशभूषा करून त्यांच्या जीवनाची माहिती दिली. सामाजिक न्याय व सुरक्षा संघटनेचे सदस्य उपस्थित होते. प्राचार्या डॉ. एस. डी. राणे, प्रा. डॉ. व्ही. ए. मोरे, प्रा. ए. पी. क्षीरसागर, प्रा. एस. बी. बरगे, प्रा. बी. बी. सोनवलकर आदी उपस्थित होते.
...
विद्यापीठ
आजीवन अध्ययन व विस्तार विभागात सांगलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला माने यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वनिता पाटील, विभागाच्या डॉ. सुमन बुवा उपस्थित होत्या.
उद्योजकता विकास यावर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वनिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. वसंत सिंघन यांनी मनोगत व्यक्त केले.
सुषमा जाधव यांनी स्वागत केले. रवींद्र खैरे यांनी प्रास्ताविक केले. आसावरी कागवाडे यांनी परिचय करुन दिला. वैशाली गुंजेकर, गायत्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका पाटील यांनी आभार मानले. आर. एम. जाधव, निखिल चव्हाण, अमर घाटगे, महेश नायकवडी उपस्थित होते. कॉमन फॅसिलिटी सेन्टरमध्ये प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी मार्गदर्शन केले. सुप्रिया साठे, सुमन सावंत, अश्विनी पाटील, आसिया जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सोनकवडे यांच्याकडून भेटवस्तू दिल्या. अजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मकसूद वाईकर यांनी आभार मानले.
...
वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र (बी.एड) महाविद्यालय
भित्तीपत्रकाचे उद्‌घाटन अॅड. डॉ. मंगला बडदारे-पाटील यांच्या हस्ते झाले. अॅड. बडदारे-पाटील यांनी महिलाविषयक विविध कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. मनिषा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, प्रा. धनंजय चाफोडीकर उपस्थित होते. प्रा. डॉ. ए. आर. पाटील, प्रा. शुभांगी पाटील, जी. एम. जिरगे उपस्थित होते. डॉ. यू. आर. पाटील यांनी संयोजन केले. वर्षा पाटील यांनी प्रास्ताविक केले. साक्षी चौगुले, पूनम कारंडे यांनी सूत्रसंचालन केले. पूजा सुतार यांनी आभार मानले.
...
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘महिला सबलीकरण’ यावर पोस्टर प्रेझेंटेशन केले. मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या देश- विदेशातील माजी विद्यार्थिनींशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. माजी विद्यार्थिनी सिमरन नागावकर हिने मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. केमिकल विभागात चित्रकला, रांगोळी आणि रेखाचित्र स्पर्धा, फन गेम आणि अनलॉक टॅलेंट स्पर्धा झाल्या. फ्री विंग फाऊंडेशनच्या संयोगीता महाजन आणि इनरव्हील सनराईजच्या अध्यक्षा सोनाली पटेल यांचे व्याख्यान झाले. कॉम्पुटर सायन्स विभागात मनोरंजक खेळ, हिडन टॅलेंट शो आणि पाककृती स्पर्धा झाल्या. सिव्हिल इंजिनिरिंग विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाच्या उपमुख्य अधिकारी अरुणा हसबे रावराणे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा आडनाईक, इगल्स ऑटोमेशनच्या संचालिका अनिता चव्हाण-गरुड यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले. आर्किटेक्चर विभागातही महिला प्राध्यापिका, कर्मचारी, विद्यार्थीनिनी एकत्र केक कापला. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉ. राजेंद्र रायकर, सांस्कृतिक समनव्यक डॉ. राहुल पाटील, डॉ. राधिका ढणाल, डॉ. सुनील रायकर, डॉ. के. टी. जाधव, डॉ. किरण माने, शताक्षी कोकाटे, डॉ. ज्योती जाधव, इंद्रजित जाधव, डॉ. टी. बी. मोहिते पाटील, डॉ. नवनीत सांगळे, एनएसएस समन्वयक योगेश चौगुले उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले.
...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
ज्येष्ठ संचालिका डॉ. निवेदिता माने, संचालिका श्रुतिका काटकर, डॉ. स्मिता पाटील, प्रिया सरीकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. महिला कक्ष विभागाचे उपव्यवस्थापक गिरीष पाटील, शेती कर्जे विभागाचे उपव्यवस्थापक शिवाजी आडनाईक, राजकुमार पाटील, रवी शिंगे, तसेंच केंद्र कार्यालयातील महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बोर्ड प्रशासन विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी स्वागत केले. बँकेच्या महिला कक्ष उपनिरीक्षक गिरिजा पुजारी यांनी आभार मानले.
-
श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल
साने गुरुजी वसाहत ः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका आर. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. ए.एस. देसाई, मुख्याध्यापक बी.यु. जाधव उपस्थित होते. ए. बी. पोवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एस. पी. डोंगळे यांनी आभार मानले.
-
मॉडर्न शिक्षण संस्था
सानेगुरुजी वसाहत ः शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला पालकांचा सत्कार संस्थेच्या सचिव डॉ. सायली कचरे यांच्या हस्ते झाला. मुख्याध्यापिका जयश्री गुरव, मीरा चौगले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तेजस्वी पुजारी, भक्ती बेंम्बडे, विशाल भोरे, कोमल परीट, भक्ती आजगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजश्री पेंडणेकर, स्वाती कांबळे, वर्षा पाटील, गीता चौगुले, कल्याणी कांबळे, शुभांगी पाटील, संगीता जाधव, राजश्री कांबळे, सविता कोळेकर, संगीता कुंभार, दिपाली कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
-
महिला महाविद्यालय
कसबा बीड ः बीडशेड येथील प्रधान मंत्री भारतीय जन औषधी केंद्रातर्फे येथील महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींनी सॅनिटरी पॅड वितरीत करण्यात आले. सरपंच व ''कुंभी''चे संचालक उत्तम वरूटे यांच्या उपस्थितीत झाले. केंद्राचे व्यवस्थापक डॉ. राजेंद्र पाटील, आरोग्य उपकेंद्राच्या प्रमुख डॉ. विनिता जाधव, प्राचार्या रोहिणी बांडागळे आरोग्यसेवक गणेश पाटील, फार्मासिस्ट संगीता पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT