कोल्हापूर

खंडपीठ जागा

CD

खंडपीठाची मूळ जागा ‘सारथी’ला

शेंडापार्क येथील जागा खंडपीठासाठी शक्य ः ‘सारथी’साठी मागविल्या हरकती


कोल्हापूर, ता.१० ः राजाराम कॉलेजजवळ असलेल्या ४० हजार चौरस मीटर जमिनीवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या येथील खंडपीठाचे आरक्षण वगळण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने नोटीस प्रसिद्ध केली आहे. खंडपीठाचे आरक्षण वगळून छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) देण्यासाठी या नोटिशीद्वारे एक महिन्यात हरकती व सूचना मागविल्या आहेत.
दरम्यान, यामुळे आता खंडपाठीसाठी असलेली मूळ राजाराम कॉलेजजवळील जागा ‘सारथी’ला देण्यात येणार आहे. तसेच शेंडापार्क येथील जागा खंडपीठासाठी आरक्षित केली असली तरीही ती निश्‍चित करून लवकरात लवकर नावावर करावी, अशी मागणी खंडपीठ कृती समितीकडून होत आहे.

शहराच्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेत राजाराम कॉलेजजवळील रि. स. क्रमांक ३७४, ३७५, ३७६,३७७, ३७८ मधील ४० हजार चौरस मीटर जमीन उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठ यासाठी महापालिकेने १८० ब या आरक्षण क्रमांकाने आरक्षित केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने १३ जून २०२२ रोजी दिलेल्या पत्राद्वारे खंडपीठासाठी शेंडा पार्कजवळील रि. स. क्रमांक ५८९ ते ७०९ ही जागा प्रस्तावित केल्याचे शासनाला कळवले. पर्यायी जागा प्रस्तावित केल्याने २ मार्च २०२२ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजाराम कॉलेजजवळील आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महसूल विभागाने राजाराम कॉलेजजवळील १.८५ हे.आर क्षेत्र छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) मुलांचे, मुलींचे वसतिगृह, रस्ता व इतर शैक्षणिक वापरासाठी प्रदान करण्यास मान्यता दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त व महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांचा अहवाल आल्यानंतर त्या जागेवरील आरक्षण वगळून सार्वजनिक-निमसार्वजनिक वापर विभागात समाविष्ट करण्यासाठी बदल करणे शासनाने ठरवले. त्यानुसार या फेरबदलाविषयी हरकती व सूचना मागवण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. एक महिन्याच्या आत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील नगररचनेच्या कोल्हापूर शाखेच्या सहायक संचालकांकडे सूचना, हरकती द्यायच्या आहेत.
----------
मंत्रालयात शेंडापार्क येथील
आरक्षित जागेचा प्रस्ताव प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी महसूल मंत्रालयात शेंडापार्क येथील आरक्षित जागेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी खंडपीठ कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके आणि सचिव ॲड. विजय ताटे-देशमुख यांनी सांगितले.
--------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT